GMC Recruitment: गोमेकॉत परिचारिकांची 178 पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; मंत्रिमंडळाची मान्यता

Goa Nursing Recruitment: गोवा वैद्यकीय महाविद्यालयात परिचारिकांची १७८ पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यास मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली.
Goa Nursing Recruitment
GMC RecruitmentDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: गोवा वैद्यकीय महाविद्यालयात परिचारिकांची १७८ पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. सुट्टीवर गेलेल्या परिचारिकांच्या जागी काम करणाऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.

शिवाय राज्यातील घरगुती वीजग्राहकांना मंजूर वीजभारापेक्षा केलेल्या जास्तीच्या वीज वापरावर आकारली गेलेली ४३ कोटी रुपयांची दंडात्मक रक्कम परत करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

Goa Nursing Recruitment
Goa Freedom Fighter: 10 वर्षांचा एकांतवास, मृत्यूची खोटी बातमी अन् मायभूमीची ओढ; गोव्याचे लोहपुरुष नारायण हरी नाईक यांची संघर्षगाथा

यावेळी पर्यटनमंत्री रोहन खंवटे उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, परिचारिकांना मोफत जर्मन भाषेचे शिक्षण देण्यात येणार आहे. बांबोळीतील सरकारी परिचारिका महाविद्यालय आणि साखळीतील साई नर्सिंग इन्‍स्‍टिट्यूट येथे ही सुविधा उपलब्ध केली जाईल. वीजग्राहकांना १ नोव्हेंबर २०२५ पासून आकारलेला दंड परत केला जाणार आहे. यासोबतच घरगुती वीजग्राहकांसाठी स्वयंचलित भारवाढ प्रणालीही लागू करण्यात येणार आहे.

मंत्रिमंडळाचे महत्त्‍वपूर्ण निर्णय

गोमेकॉतील बाल न्युरो पुनर्वसन केंद्रात दोन फिजिओथेरपिस्ट कंत्राटी पद्धतीने नेमणार

गोमेकॉच्या हृदयविकार विभागातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांना आणखी ५ वर्षांसाठी नियुक्ती देणार

गोमेकॉतील ९.११ कोटी रुपयांच्या खर्चाला कार्योत्तर मंजुरी

गोवा माहिती आयोग आता सर्वसाधारण प्रशासन खात्याच्या अख्यत्यारीत

कॉम्प्रेस्ड बायोगॅस धोरणाला मंजुरी

Goa Nursing Recruitment
Goa Agriculture News: डिचोलीत भातकापणीला वेग; अवकाळी पावसामुळे यंदा उत्पादनात 50 टक्के घट होण्याची शक्यता

गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयात कंत्राटी पद्धतीने ९ प्रयोगशाळा साहाय्‍यक आणि २ कार्यशाळा प्रशिक्षकांची पदे भरणार

साळावली येथील ३ हजार चौरस मीटरचा भूखंड पेयजल खात्याकडे वर्ग

माहिती तंत्रज्ञान स्टार्ट-अपसाठी लागू असलेली प्रोत्साहन योजना बिगर माहिती तंत्रज्ञान स्टार्टअपसाठीही लागू करण्याचा निर्णय

कुशावती जिल्ह्यासाठी १९ विविध पदांना मंजुरी

मयडे येथे रास्त दर धान्यदुकान परवाना मंजूर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com