Goa Assembly Session 2026: गोवा विधानसभेचे हिवाळी अधिवेशन केवळ एक दिवसाचे; 16 डिसेंबरची तारीख निश्चित, विरोधकांचा कालावधी वाढवण्याचा आग्रह

December 16 Assembly Session: गोवा राज्य विधानसभेचे पंधरावे अधिवेशन येत्या १६ डिसेंबर रोजी केवळ एका दिवसासाठी बोलावण्यात आले आहे.
December 16 Assembly Session
One Day Assembly SessionDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: गोवा राज्य विधानसभेचे पंधरावे अधिवेशन येत्या १६ डिसेंबर रोजी केवळ एका दिवसासाठी बोलावण्यात आले आहे. राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केला आहे.

त्यानुसार सकाळी ११.३० वाजता पर्वरी येथील विधानसभा सभागृहात या हिवाळी अधिवेशनाचे कामकाज सुरू होईल. विधानसभेचे मागील अधिवेशन २ सप्टेंबर रोजी संपले होते. भारतीय संविधानातील तरतुदीनुसार, एका अधिवेशनाच्या शेवटच्या बैठकीपासून पुढील अधिवेशनाच्या पहिल्या बैठकीपर्यंत सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी असता कामा नये. त्यामुळे पुढील अधिवेशन २ मार्चपूर्वी घेणे घटनात्मकदृष्ट्या आवश्यक आहे.a

December 16 Assembly Session
Human Trafficking In Goa: मुलाच्या वाढदिवसासाठी घेतले कर्ज, फेडण्यासाठी गोव्यात गेली; महिला मानवी तस्करांच्या जाळ्यात

दरम्यान, राज्यात फेब्रुवारी महिन्यात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता असून, जानेवारीमध्ये निवडणूक आचारसंहिता लागू होऊ शकते. आचारसंहितेच्या काळात नियमित अर्थसंकल्पीय अधिवेशन घेणे आणि अर्थसंकल्प मांडणे अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने डिसेंबरमध्येच एक दिवसाचे अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. मात्र, या अधिवेशनात अर्थसंकल्प मांडला जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केवळ एक दिवसाचे अधिवेशन बोलावणे हा लोकशाहीचा अपमान असल्याची टीका केली आहे. राज्यातील अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा होणे आवश्यक असताना त्यासाठी एक दिवसाचा कालावधी अत्यंत अपुरा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

राज्यातील कायदा व सुव्यवस्था, महिला आणि बालकांवरील वाढते अत्याचार, बेरोजगारी, म्हादई पाणीप्रश्न, पर्यावरणाचा ऱ्हास, कोळसा हाताळणी, वाढते सार्वजनिक कर्ज तसेच शिक्षण क्षेत्रातील समस्यांवर सरकारने सभागृहात उत्तरे द्यावीत, अशी मागणी युरी आलेमाव यांनी केली आहे. या सर्व प्रश्नांवर सविस्तर चर्चा होण्यासाठी पुरेसा वेळ मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

निवडणुकीचे गणित कारणीभूत?

राज्यात फेब्रुवारी २०२७ मध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. जानेवारीमध्ये निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यास नियमित अर्थसंकल्पीय अधिवेशन घेणे अडचणीचे ठरू शकते. त्यामुळे सहा महिन्यांच्या घटनात्मक मर्यादेत राहून सरकारने १६ डिसेंबरला एक दिवसाचे अधिवेशन बोलावल्याचे मानले जात आहे. या अधिवेशनात अर्थसंकल्प मांडला जाणार नाही.

December 16 Assembly Session
Goa Fire Services Sports Festival: अग्निशमन जवान मैदानात उतरणार! पणजीत 14 व्या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन; चार दिवस विविध स्पर्धांचा थरार

सरकारला सवाल

एक दिवसात राज्यातील ज्वलंत प्रश्नांवर चर्चा कशी होणार, असा सवाल विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला आहे. महिला व बालकांवरील अत्याचार, बेरोजगारी, म्हादई, पर्यावरणाची हानी, कोळसा हाताळणी, सार्वजनिक कर्ज आणि शिक्षण क्षेत्रातील प्रश्न उपस्थित करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणे आवश्यक आहे. सरकार चर्चेपासून पळ काढत आहे, असे ते म्‍हणाले.

केवळ एक दिवसाचे अधिवेशन बोलावणे हा लोकशाहीचा अवमान आहे. विधानसभा हे सरकारचे खासगी व्यासपीठ नसून जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे महत्त्वाचे लोकशाही व्यासपीठ आहे. सरकारने प्रश्नांना सामोरे जाण्याऐवजी चर्चेपासून पळ काढू नये. अधिवेशनाचा कालावधी वाढवून राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करावी.

- युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.