Goa BJP Protest: 'राहुल गांधी यांनी माफी मागावी'! गोवा भाजपची निदर्शने; PM मोदींवरील आक्षेपार्ह वक्तव्यावरून कार्यकर्ते आक्रमक

Goa Congress: पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या स्वर्गवासी मातोश्रींबाबत काँग्रेस नेत्यांनी केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ गोवा भाजपने पणजीतील काँग्रेस भवनावर मोर्चा काढला.
Goa BJP Protest
Goa BJP ProtestDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या स्वर्गवासी मातोश्रींबाबत काँग्रेस नेत्यांनी केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ गोवा भाजपने पणजीतील काँग्रेस भवनावर मोर्चा काढला. या निदर्शनात भाजपचे नेते व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत काँग्रेसवर जोरदार घोषणाबाजी केली.

भाजप नेत्यांनी काँग्रेसवर तीव्र शब्दांत हल्लाबोल करताना, “काँग्रेस नेत्यांचे वक्तव्य हे भारतीय संस्कृतीविरोधी असून समाजात द्वेष निर्माण करणारे आहे,” असा आरोप केला. त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तातडीने माफी मागावी, अशी मागणी केली.

त्यांनी हातात फलक, बॅनर घेऊन निषेध व्यक्त केला. मोर्चादरम्यान काँग्रेस भवन परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. काही वेळ घोषणाबाजी केल्यानंतर भाजप प्रतिनिधींनी काँग्रेस भवनाबाहेर निदर्शने केली.

या आंदोलनात राज्य भाजप उपाध्यक्ष ॲड. नरेंद्र सावईकर, कुंदा चोडणकर, दक्षिण गोवा जिल्हा परिषद अध्यक्षा अनीता थोरात, आमदार दाजी साळकर, प्रेमेंद्र शेट, केदार नाईक, डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

Goa BJP Protest
BJP Poster War: रुमडामळमध्‍ये 'पोस्टर वॉर', भाजपचे दोन गट भिडले! पोलिसांच्या हस्तक्षेपाने तणाव निवळला

यावेळी भाजप राज्य महासचिव सर्वानंद भगत, माध्यम संयोजक सिद्धेश नाईक, भाजयुमो अध्यक्ष समीर मांद्रेकर, सुवर्णा तेंडुलकर, राज्य सचिव दीपक नाईक, उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष धाकू मडकईकर, उत्तर गोवा भाजप अध्यक्ष दयानंद कर्बोटकर, दक्षिण गोवा भाजप अध्यक्ष प्रभाकर गावकर तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Goa BJP Protest
Goa AAP: 'विधानसभेच्या 40 जागा लढवणार'! आतिषींचा पुनरुच्चार; 2027 साठी 'आप'चा स्वबळाकडे कल

...खरे रूप दाखवले!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काँग्रेसकडून बदनामी सुरू असल्याच्या निषेधार्थ भाजपने आज काँग्रेस कार्यालयावर मोर्चा काढला. त्याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी निषेध केला. कार्यालयाबाहेर पत्रकार परिषद घेऊन भाजपने आज हद्द पार केली आहे. भाजपने आपले खरे रूप दाखवून दिले आहे. काँग्रेसच्या मुख्य कार्यालयाच्या पक्षावर काळी शाई टाकण्याचे काम केले आहे, हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे, असा प्रकार गोव्यात पाहायला मिळत आहे, त्याचा आम्ही निषेध करीत आहोत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी पक्षाची पात्रता दाखविली, अशा प्रकारचे कृत्य यापूर्वी केलेले नाही, ते भाजपने केले आहे, असे पाटकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com