BJP Poster War: रुमडामळमध्‍ये 'पोस्टर वॉर', भाजपचे दोन गट भिडले! पोलिसांच्या हस्तक्षेपाने तणाव निवळला

Margao: एरव्ही हिंदू मुस्लिम वादामुळे नेहमीच चर्चेत राहणारा रुमडामळ पंचायत परिसर आमदारांच्या चतुर्थीच्या शुभेच्छांच्या पोस्टरमुळे वाद होऊन तणावग्रस्त झाला.
BJP Poster War
BJP Poster WarDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: एरव्ही हिंदू मुस्लिम वादामुळे नेहमीच चर्चेत राहणारा रुमडामळ पंचायत परिसर आमदारांच्या चतुर्थीच्या शुभेच्छांच्या पोस्टरमुळे वाद होऊन तणावग्रस्त झाला. या भागातील मोक्याच्या ठिकाणी कुणाचे पोस्टर लावावे या कारणावरून भाजपमधीलच दोन गट एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले.

रुमडामळ येथे आमदार उल्हास तुयेकर यांनी मोक्याच्या ठिकाणी शुभेच्छा फलक लावल्याने स्थानिक पंच सदस्य विनायक वळवईकर यांनी त्याला आक्षेप घेत ते काल काढून आपले पोस्टर लावल्याने हा वाद सुरू झाला.

नावेली भाजप मंडळ अध्यक्ष विजय सुरमे यांनी आज वळवईकर यांचे पोस्टर हटवून तेथे पुन्हा आमदारांचे पोस्टर लावले. त्यावरून या भागातील वातावरण तणावग्रस्त झाले. शेवटी पोलिसांना मध्यस्थी करून हा वाद मिटवावा लागला.

BJP Poster War
Goa Politics: कामत, तवडकर बिनखात्याचेच; पाच दिवस उलटले, खाते वाटपास आणखी विलंब शक्य‍

आमदार तुयेकर यांनी रुमडामळसाठी काहीच केलेले नाही. त्यामुळे त्यांचे पोस्टर येथे का? असे म्हणून आपण त्यांचे पोस्टर काढून टाकले, असे पंच वळवईकर यांनी सांगितले, तर सुरमे यांनी हे सर्व आरोप धुडकावून लावताना, रुमडामळ भागात आमदार तुयेकर यांनी भरपूर काम केले आहे. त्यांनी या भागातील युवकांना नोकऱ्याही मिळवून दिल्या आहेत.

BJP Poster War
Goa Waterfall Ban: पावसाळ्यातील अपघातांवर अंकुश! उत्तर गोव्यातील धबधबे अन् नद्यांमध्ये प्रवेशास बंदी; जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी

खुद्द वळवईकर यांच्या प्रभागातील युवकांनाही नोकऱ्या मिळाल्या आहेत, पण वळवईकर यांचे स्वतःचेच लक्ष आपल्या प्रभागाकडे नसल्याने त्यांना या सर्व गोष्टी माहीत नसाव्यात अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com