
पणजी: आम आदमी पक्षाच्या प्रभारी आतिषी यांचे गोव्यातील दौरे वाढले आहेत. मागील पंधरा दिवसांच्या कालावधीनंतर त्यांचा हा दुसरा दौरा असून, त्यांनी पुन्हा एकदा विधानसभेच्या २०२७ च्या निवडणुकीत स्वबळाची भाषा केली आहे.
४० जागा आप लढणार असल्याचे त्यांनी पुनरुच्चार केल्याने विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीत राहणार नाही, सध्यातरी चित्र स्पष्ट दिसत आहे. गोवा प्रभारी आतिषी यांचा गोवा दौरा सुरू आहे, सध्या गणेशोत्सवानिमित्त ते पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन गणेशाचे दर्शन घेत आहेत. त्याशिवाय आरतीच्यावेळी घुमट वादनही करीत आहेत.
त्यांनी एका पदाधिकाऱ्याच्या घरी गणेशाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी स्थानिक पत्रकारांसमोर विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर भाष्य केले. त्यांनी विधानसभेला ४०ही जागांवर आप जागा लढवणार असल्याचा पुनरुच्चार केला होता, त्यामुळे आपची स्वबळाचीच भाषा समोर येत आहे.
मागील वेळीही आतिषी यांनी आप स्वबळावर लढणार असल्याचे सांगितल्यानंतर काही दिवसांनी प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनीही त्यांच्या सुरात सूर मिसळला होता.
भाजपला पराभूत करायचे झाल्यास सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित येण्याची गरज असल्याचे आपबरोबर काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डचे नेते सांगत होते. परंतु आता पालेकर यांनीही भाषा बदलल्याने आप इंडिया आघाडीत जाणार नाही, असे सध्याचे चित्र आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.