Goa Monsoon: गोव्यात बीचवर पोहण्यास बंदी; वॉटर स्पोर्ट्सही बंद

मॉन्सुनमुळे दृष्टी मरीनकडून दिशानिर्देश जारी
Swimming not allowed on Goa Beach in monsoon season
Swimming not allowed on Goa Beach in monsoon seasonDainik Gomantak

Swimming not allowed on Goa Beach: गोव्यात मॉन्सूनला सुरवात झाल्यानंतर समुद्रकिनारे पोहण्यासाठी बंद करण्यात येत आहेत. तसे दिशानिर्देश गोवा सरकारने राज्यातील समुद्रकिनाऱ्यांवर बचाव आणि मदत कार्यासाठी नियुक्त केलेल्या दृष्टी मरीन या खासगी संस्थेतर्फे देण्यात आली आहे. दरम्यान, वॉटरस्पोर्टसवही आता बंदी घालण्यात आली आहे.

दृष्टी मरीनचे 400 जीवरक्षक वर्षभर गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर गस्त घालत असते. पावसाला सुरवात झाल्यानंतर आता उंच लाटा येण्याची अपेक्षा आहे.

दृष्टी मरीनच्या देखरेखीखाली सर्व समुद्रकिनाऱ्यांवर लाल ध्वज लावले आहेत. जे समुद्रकिनारी जाणाऱ्यांना समुद्रात जाण्यापासून परावृत्त करतात.

Swimming not allowed on Goa Beach in monsoon season
Goa High Tide: गोव्यात मंगळवारपर्यंत हायटाईडचा इशारा; लहान बोटी समुद्रात न नेण्याचे आवाहन

“हवामानातील बदल आणि मान्सून सरींमुळे समुद्रकिनारे यापुढे पोहण्यासाठी बंद केले जातील. जलक्रीडा उपक्रमही बंद करण्यात आला आहे,” असे दृष्टी मरीनचे सीईओ नवीन अवस्थी यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.

पाण्यात न जाण्याचा सल्ला देण्यात येत आहे. आम्ही सर्व समुद्रकिना-यावर लाल झेंडे लावले आहेत. झेंडा लावलेले क्षेत्र पोहण्यासाठी योग्य नाही, असा त्याचा अर्थ आहे. किनार्‍यावर ‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍खराब हवामानातही बचावकार्य करण्यासाठी पथकाला प्रशिक्षण देण्यात आले आहे.

समुद्रआतील खडक, किनाऱ्यावरील टेकड्यांवर जाण्याचे टाळा, असा सल्लाही दृष्टीकडून देण्यात आला आहे. पावसाळ्यात हे भाग निसरडे झालेले असतात. तसेच पावसात लाटांची उंची, तीव्रता आणि वारंवारता जास्त असते, त्यामुळे समुद्राच्या पाण्यात जाऊ नये.

Swimming not allowed on Goa Beach in monsoon season
Goa Monsoon: चिवार-हणजुणे येथे वडाचे झाड घरावर कोसळले; दोन लाखांचे नुकसान

दृष्टी मरीनने दिलेल्या टिप्स

  1. समुद्रकिनाऱ्याला भेट देणाऱ्यांनी वॉटरलाईनपासून किमान 10 मीटर अंतर ठेवावे.

  2. जीवरक्षकांनी दिलेल्या सूचना ऐकाव्यात.

  3. समुद्रकिनाऱ्यावर मुलांवर बारकाईने लक्ष ठेवा.

  4. उथळ पाण्यातही मुलांना जाऊ देऊ नका.

  5. वीजा, गडगडाटावेळी समुद्रात जाणे टाळा

  6. जून ते सप्टेंबर या काळात समुद्रकिनाऱ्यावर पोहणे किंवा कोणत्याही जलक्रीडा उपक्रमात सहभागी होऊ नका.

  7. समुद्र शांत वाटत असला तरी, अचानक मोठी लाट खोल पाण्यात खेचू शकते.

  8. मद्य पिऊन पाण्यात जाऊ नका.

  9. समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षाविषयक चिन्हे नेहमी वाचा आणि त्यांचे पालन करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com