Goa Hinterland Tourism: गुड न्यूज! गोव्याच्या अंतर्गत भागातील पर्यटनात मोठी वाढ

पश्चिम घाटातील ठिकाणांना पसंती, आंतरराष्ट्रीय पर्यटकांचाही प्रतिसाद
Goa Hinterland Tourism
Goa Hinterland TourismDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Hinterland Tourism: गोवा हे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ आहे. देश-विदेशातील पर्यटक गोव्यात येत असतात. पण यातील बहुतांश पर्यटक हे गोव्यातील स्वच्छ, सुंदर समुद्र किनाऱ्यांसाठी गोव्यात येत असतात. त्यामुळेच सुंदर समुद्रकिनारे ही गोव्याची ओळखही बनली आहे.

तथापि, केवळ बीचेसच नव्हे तर गोव्याच्या अंतर्गत भागातील पर्यटनातही गेल्या काही काळात मोठी वाढ दिसून आली आहे. विशेष म्हणजे, यात देशी पर्यटकांसह परदेशी पर्यटकांचाही समावेश आहे. इंग्रजी, हिंदी प्रसारमाध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे.

Goa Hinterland Tourism
Goa Monsoon: गोव्यात बीचवर पोहण्यास बंदी; वॉटर स्पोर्ट्सही बंद

गोव्याच्या अंतर्गत भागात झालेल्या पर्यटनात पश्चिम घाटाला लागून असलेल्या चार तालुक्यांत पर्यटनाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यामध्ये सत्तरी, काणकोण, धारबांदोडा, सांगे या तालुक्यांचा समावेश आहे. या ठिकाणी झालेल्या पर्यटनात देशी पर्यटकांमध्ये 50 टक्के तर आंतरराष्ट्रीय पर्यटकांमध्ये 1000 टक्के वाढ नोंद झाली आहे.

सरकारी आकडेवारीनुसार 2021 मध्ये 65 हजार हून अधिक देशी आणि 1,300 हून अधिक आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी गोव्याच्या अंतर्गत भागांना भेटी दिल्या होत्या. तर 2022 मध्ये 1.1 लाखाहून अधिक देशी आणि 14,000 हून अधिक परदेशी पर्यटकांनी या भागांना भेट दिली होती.

समुद्रकिनारे तर आहेतच पण अंतर्गत भागातही पर्यटन वाढावे, यासाठी गोवा सरकार प्रयत्न करत आहे. हंटरलँड टुरिझम म्हणजे केवळ धबधब्यांना भेट देणे नव्हे, तर पर्यटकांनी स्थानिक संस्कृतीचा अनुभव घ्यावा, अशी सरकारची इच्छा आहे.

दरम्यान, गोव्यात 70 हून अधिक लहान-मोठे धबधबे आहेत.

Goa Hinterland Tourism
High Tide Alert in Goa: गोव्यात मंगळवारपर्यंत हायटाईडचा इशारा; लहान बोटी समुद्रात न नेण्याचे आवाहन

विविध ट्रेल्स

राज्य सरकारने गोव्यातील पर्यटन आणि ट्रेल्सची संकल्पना तयार करण्यासाठी एजन्सींना आमंत्रित केले आहे. नेचर ट्रेल्स, आर्किटेक्चर टूर, हेरिटेज ट्रेल्स, व्हिलेज वॉक, स्पिरिच्युअल ट्रेल्स आणि बर्ड वॉचिंग ट्रिप अशा पद्धतीच्या ट्रेल्स आयोजित केल्या जाणार आहेत.

ब्रुअरी टुर

गोव्यातील पर्यटनाचे अनपेक्षित पैलू आणि विविध प्रेक्षणीय स्थळे समोर आणण्यासाठी कॅम्पिंग, बाईक टूर, खाद्यपदार्थ आणि पाककला टूर, ब्रुअरी टूर इत्यादी संकल्पनांसाठीही सरकार

उत्सुक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com