गोवा बीचवर बायकोशी झाला वाद, नवऱ्याने जीव द्यायला समुद्रात घेतली धाव; मदतीला आलेल्या जीवरक्षकालाही केली मारहाण

Goa News: व्यक्ती समुद्रात धावत असल्याचे पाहून घटनास्थळी असलेल्या गावडे या जीवरक्षकाने व्यक्तीला वाचविण्यासाठी धाव घेतली.
Goa beach incident husband wife fight
Goa beachDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जीव देण्यासाठी समुद्रात धाव घेतलेल्या व्यक्तीला वाचविण्यासाठी गेलेल्या जीवरक्षकालाच मारहाण करण्यात आली. मारहाण झाली तरीही जीवरक्षकाने कर्तव्यात कुचराई न करता संबधित व्यक्तीला समुद्रात सुरक्षितपणे बाहेर काढले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

बेताळभाटी समुद्रकिनाऱ्यावर गुरुवारी (१४ ऑगस्ट) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. लक्ष्मीकांत गावडे (३१) असे कर्तव्यदक्ष दृष्टीच्या जीवरक्षकाचे नाव आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, बेताळभाटी समुद्रकिनारी ४५ ते ५० वर्षीय व्यक्तीने जीव देण्यासाठी समुद्रात धाव घेतली. व्यक्ती समुद्रात धावत असल्याचे पाहून घटनास्थळी असलेल्या गावडे या जीवरक्षकाने व्यक्तीला वाचविण्यासाठी धाव घेतली.

Goa beach incident husband wife fight
Vote Chori: गोव्यात सापडले नेपाळी मतदार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांचा Ground Survey

गावडे यांनी व्यक्तीला धोकादायक समुद्रातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला त्यावेळी व्यक्तीने गावडेंना मारहाण करण्यास सुरुवात केली. गावडे समुद्र धोकादायक असल्याचे समजावून सांगत असले तरी या व्यक्ती मारहाण करतच होता. पण, गावडे यांनी संयम ढळू न देता किंवा पुन्हा प्रतिहल्ला करण्यापेक्षा कर्तव्याला प्राधान्य देत व्यक्तीला सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि अखेर त्यांना सुरक्षित बाहेर काढले.

याप्रकरणी मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार, समुद्रात जीव देण्यासाठी गेलेला व्यक्ती बायकोसोबत समुद्रकिनाऱ्यावर फिरत होता. यावेळी दोघांमध्ये कोणत्यातरी गोष्टीवर वाद झाला. या वादामुळे खिन्न झालेल्या व्यक्तीने जीव देण्यासाठी समुद्रात धाव घेतल्याचे समोर आले. बायको आणि समुद्रकिनाऱ्यावरील इतरांनी मदतीसाठी आरडाओरडा केल्यानंतर गावडे यांनी धाव घेतली होती.

Goa beach incident husband wife fight
Asia Cup 2025: संजू सॅमसन नाही, KL राहुल नाही; आशिया कपबाबत मोठी बातमी, माजी खेळाडूने केला खुलासा

हा सगळा प्रकार सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी संबधित व्यक्तीला ताब्यात घेतले. दरम्यान, याबाबत अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. गुन्हा दाखल करण्याबाबत निर्णय शनिवारी घेतला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, व्यक्तीने जीवरक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी माफी मागितल्याची माहिती समोर आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com