
अजित अगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती मंगळवार (१९ ऑगस्ट) रोजी भारताच्या आशिया कप संघाची घोषणा करण्यास तयार आहे. सूर्यकुमार यादव या स्पर्धेसाठी तंदुरुस्त दिसत आहे आणि ‘मेन इन ब्लू’चे नेतृत्व करण्यास सज्ज आहेत. १५ सदस्यांच्या संघाची निवड करताना निवड समितीतीसमोर अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
निवड बैठकीपूर्वी मात्र हरभजन सिंग यांनी आशिया कपसाठी भारताचा संभाव्य संघ सांगितला आहे. हरभजन सिंग २०१६ मध्ये पहिल्या टी-२० फॉरमॅटमध्ये खेळल्या गेलेल्या आशिया कप जिंकलेल्या संघाचा भाग होता .
हरभजनने संजू सॅमसनला दुर्लक्षित करत यशस्वी जैसवाल, शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा हे तीन ओपनर्स म्हणून निवडले. श्रेयस अय्यर हरभजनच्या टी-२० संघात आहे; तो २०२३ पासून टी-२० सिरीज खेळला नाही आहे. या संघात तिलक वर्मासाठीही जागा नाही कारण हरभजनने वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल आणि रियान पराग हे तीन स्पिन-बॉलिंग ऑलराउंडर्स निवडले आहेत.
हरभजनच्या आशिया कप संघात हे खेळाडू आहेत: यशस्वी जयसवाल, अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कॅप्टन), हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, रियान पराग, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग. हरभजनने सांगितले की, केएल राहुलचे नाव मी घेतले नाही, पण तो एक चांगला पर्याय असू शकतो. रिषभ पंत पायाच्या फ्रॅक्चरमुळे काही महिन्यांसाठी बाहेर राहणार आहे.
भारताचे आशिया कप शेड्यूल: भारत आपला मोहीम १० सप्टेंबरला UAE विरुद्ध सुरू करेल. १४ सप्टेंबरला पाकिस्तानशी सामना असेल. १९ सप्टेंबरला भारत आणि ओमान भिडतील. स्पर्धेचा अंतिम सामना २८ सप्टेंबरला खेळवला जाईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.