
पणजी: काँग्रेसने देशभरात बोगस मतदारांचा मुद्दा उपस्थित करुन निडणूक आयोगावर सवाल उपस्थित केला आहे. राहुल गांधींनी बोगस मतदारांचा प्रकार उघडकीस आणल्यानंतर देशभर याबाबत काँग्रेस नेते आवाज उठवताना दिसत आहेत. गोव्यात देखील प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांनी पणजीत ग्राऊंड सर्व्हे केला असता चार नेपाळी बोगस मतदार आढळून आल्याचा दावा पाटकरांनी केला आहे.
प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांनी धेंपो भाट, टोंका भागात पडताळणी केली असता एका अपार्टमेंटमध्ये गोंमतकीय कुटुंब वास्तव्याला असल्याचे दिसून आले पण, त्याठिकाणी चार नेपाळी नागरिकांची मतदार म्हणून नोंद केल्याचे आढळून आले. या पत्त्यावर नेपाळी नागरिकांचे नाव नोंद असले तरी त्यांचे वास्तव्य तिथे नसल्याचे आढळून आले, असा दावा पाटकरांनी केला आहे.
विदेशी नागरिक भारतीय नागरिकत्व न स्वीकारता भारतीय मतदान ओळखपत्र मिळवू शकतो का? तसे नसेल तर त्यांचे नाव मतदार यादीत कसे नोंदविण्यात आले? असा सवाल पाटकरांनी उपस्थित केला. पाटकरांनी याच अपार्टमेंटपासून जवळच राहणाऱ्या बूथ अधिकाऱ्यावरही सवाल उपस्थित करत त्यांनी कारवाई करण्यासाठी योग्य पाऊले न उचलल्याचा ठपका ठेवला.
बोगस मतदार नोंदणी हा गंभीर प्रकार असून त्याकडे दुर्लेक्ष केले जाऊ शकत नाही, असे पाटकर म्हणाले. निवडणूक आयोगाने या प्रकारात काळजीपूर्वक लक्ष घालून प्रकाराचा तपास करावा, बोगस मतदारांची नावे काढून टाकावीत आणि संबधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी अमित पाटकरांनी केला.
बोगस मतदारांची भरमसाठ नावे मतदार यादीत नोंदविण्यात आल्याबाबत राहुल गांधींनी चिंता व्यक्त केली होती. याबाबत त्याने सदोहरण देत प्रकार उघडकीस आणला होता. हजारो बोगस मतदारांची नावे मतदार यादीत नोंद केल्याचा त्यांनी आरोप केला होता. याबाबत इंडिया आघाडीच्या नेत्यांनी मोर्चा देखील काढला होता यावेळी राहुल गांधींसह अनेक बड्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.