भाजपने (BJP) देशातील सरकारी मालकीच्या अनेक संस्था, कंपन्या विकण्याचा सपाटा लावला आहे. भाजप देश विकून खात आहे. त्यामुळे भाजपला घरी बसवण्यासाठी आणि गोव्याच्या (Goa)भविष्यासाठी तृणमूल काँग्रेस (TMC) आणि मगो पक्ष (Maharashtrawadi Gomantak Party) एकत्रित आल्याची घोषणा तृणमूल पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी पणजीत केली आहे. तृणमूल आणि मगोपच्या युतीच्या पणजीतील सभेत त्या बोलत होत्या. यावेळी तृणमूल काँग्रेसच्यावतीने बॅनर्जी यांच्यासह सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी, खासदार महुआ मोईत्रा, डेरिक ओब्रायन, लुईझिन फालेरो, आमदार चर्चिल आलेमाव तर मगोपच्यावतीने अध्यक्ष दीपक ढवळीकर, आमदार सुदिन ढवळीकर, नरेश सावळ उपस्थित होते.(TMC & Maharashtrawadi Gomantak Party alliance in Goa )
भाजपची दादागिरी यापुढे आम्हाला नको असे म्हणत भाजपला निवडणुका जवळ आल्या की, ‘मॉं गंगा’ आठवते, गंगेत डुबकी मारली जाते. हे उत्तराखंड गुहेमध्ये जातात एरव्ही मात्र कोरोनाचे मृतदेह गंगेत टाकून गंगा अपवित्र केले जाते, हीच परिस्थिती सर्वत्र आहे. भाजपकडून केवळ दादागिरी आणि गुंडागिरी केली जाते. बांगला देशामधील व्हिडिओ बंगालचे व्हिडिओ म्हणून पसरवले जातात. तृणमूल सर्व जाती-धर्मांना समान मानतो. सर्व जाती-धर्मातील लोकांचा सन्मान करतो हे भाजपने कधीच केले नाही. असेही बॅनर्जी म्हणाल्या.
तृणमूल काँग्रेस-मगोप युती घोषणेच्या पणजीतील सभेला दोन्ही पक्षाच्यावतीने मोठी गर्दी केली होती. त्यासाठी वेगवेगळ्या भागातून बसेस करून कार्यकर्त्यांना आणण्यात आले होते. या कार्यकर्त्यांना तृणमूलची टोपी आणि झेंडा देण्यात आला होता. तर बहुतांश कार्यकर्त्यांना मगो पक्षाचा भगवा स्कार्फ देण्यात आला होता.
भाजपच्या नरकासुराला नष्ट करा : सुदिन
सुदिन ढवळीकर यांनी भाजपवरच टीका करत राज्यात भाजपला सत्तेवर आणण्यासाठी मगोपने अपार कष्ट केले; मात्र याच भाजपने मगो पक्ष संपवला. गेल्या पाच वर्षांमध्ये राज्यात सर्वत्र भ्रष्टाचार पसरला आहे. आता भाजपच्या नरकासुराला नष्ट केला पाहिजे म्हणून आम्ही एकत्रित येत आहोत. भाजपकडून तृणमूलची आणि मगो पक्षाची अभेद्य युती म्हणून बदनामी सुरू आहे, असेही ढवळीकर म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.