पणजी: गेल्या वर्षी म्हादई अभयारण्य (Mhadei wildlife sanctuary) परिसरात चार वाघांवर (Tiger) विषप्रयोगाद्वारे हत्या केल्याची घटना घडली. यंदा पुन्हा वाघांकडून सुर्ला-सत्तरीत (Sattari) धनगर कुटुंबाची म्हैस मारल्याने व्याघ्र हत्येसारख्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी. व्याघ्रहत्या रोखण्यासाठी वनखाते (Forest Department) करते काय, असा सवाल करून पर्यावरण कार्यकर्ते राजेंद्र केरकर यांनी सुर्ला येथे वास्तव्यास असणाऱ्या वाघांवर सतत लक्ष ठेवण्यासाठी त्वरित पावले उचलण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. (Rajendra Kerkar expressed the view that work needs to be done to stop the killing of tigers in Goa)
‘गोमन्तक’शी बोलताना केरकर म्हणाले, की सत्तरीतील म्हादईचे अभयारण्य हे निसर्गदत्त पट्टेरी वाघांचा अधिवास आहे. वन्यजीव विभागाने गोळावली येथील धनगर कुटुंबीयांसारखे अघोरी पाऊल उचलू नये. वाघांचे अस्तित्व सुरक्षित ठेवण्यासाठी गोवा सरकारच्या वन्यजीव विभागाने गोळावली येथील धनगर कुटुंबीयांसारखे अघोरी पाऊल उचलू नये. त्यांच्या सुरक्षेसाठी अधिक व्यापक उपाययोजना कराव्यात.
ते म्हणाले की, गेल्या पंधरवड्यात वाघाने देऊ पिंगळे यांच्या म्हशीवर हल्ला करून तिला गतप्राण केल्यावर तिच्या मांसावरती ताव मारला. या घटनेची बातमी मिळताच वन खात्याच्या साहाय्यक उपवनपाल तेजस्विनी आणि म्हादईचे वन परिक्षेत्राधिकारी नारायण प्रभुदेसाई यांना त्या कुटुंबीयांच्या घरी भेट देऊन त्यांना नुकसान भरपाई देण्यासाठीची प्रक्रिया कार्यान्वित केलेली आहे. उपवनपाल ज्ये ब्यास्तीन अरुलराज यांनी म्हादईत वास्तव्यास असलेल्या वाघांवरती लक्ष ठेवण्यासाठी संबंधित वन कर्मचारी गस्तीवर असून संकटग्रस्त कुटुंबाला लवकरच नुकसान भरपाई देणार असल्याचे स्पष्ट केलेले आहे, असेही केरकर यांनी नमूद केले.
विशेष कृतिदल कार्यान्वित करा!
पर्यावरण कार्यकर्ते राजेंद्र केरकर यांनी सध्या म्हादई अभयारण्यात तीन पट्टेरी वाघांचे वास्तव्य असल्याने, वन खात्याने सुर्ल येथील घुंगूरड्याचो तसेच जळवतीचो वझर त्याचप्रमाणे वायंगिणी, साटरे त्याचप्रमाणे अभयारण्य क्षेत्रात धांगडधिंगाणा घालणाऱ्या अतिउत्साही लोकांवरती कडक निर्बंध घालण्याची मागणी केली.
वाघांच्या हालचालींवरही लक्ष ठेवण्यासाठी विशेष कृतिदल कार्यान्वित करून, स्वतंत्र जीपगाडी आणि आधुनिक जलद संपर्क सुविधा पुरविण्याबरोबर संबंधित वन कर्मचाऱ्यांकडे आणखी कॅमेरा ट्रॅप, तसेच ड्रोनची व्यवस्था पुरविण्याची सूचना केली.
हणजुणे धरणाच्या जलाशय आणि परिसरात बेकायदेशीपणे मासेमारी आणि जंगली श्वापदांच्या होणाऱ्या शिकारीवरही आळा घालण्याबरोबर वाघेरीच्या जंगलात आरंभलेल्या वृक्षतोडीला त्वरित रोखण्याचीही गरज त्यांनी व्यक्त केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.