Goa Politics: "राज्याचा प्रवास विकासाऐवजी विनाशाकडे"

भाजप आणि कॉंग्रेससोबत आघाडी केली जाणार नाही हा पक्षाचा धोरणात्मक निर्णय असल्याचे ‘आप’च्या (AAP) आतिषी मारलेना (Atishi Marlena) यांनी सांगितले आहे.
आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिषी मारलेना
आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिषी मारलेना Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: निसर्गाने गोव्याला भरभरून दिले आहे. येथील साक्षरतेचे प्रमाणही बऱ्यापैकी आहे. मात्र, रोजगारसंधी निर्माण करण्यात आजवरच्या सरकारांना आलेले अपयश आणि राजकारण म्हणजे खिसे भरणे, ही बळावलेली प्रवृत्ती यामुळे गोव्याचा विकासाऐवजी विनाशाकडे प्रवास झाल्याचे निरीक्षण आम आदमी पक्षाच्या दिल्लीतील आमदार आतिषी मारलेना यांनी येथे व्यक्त केले. (Atishi Marlena has said that Goa's journey is towards destruction instead of development)

गोमन्तक कार्यालयाला त्यांनी आज (शनिवारी) सदिच्छा भेट देऊन संवाद साधताना त्यांनी हे निरीक्षण नोंदवले. त्या म्हणाल्या, महाविद्यालयात असतानापासून गोव्याच्या निसर्ग संपदेची माहिती होती. 2018 मध्ये पहिल्यांदा आले, तेव्हा निसर्ग भरभरून पाहिला. येथील जनता सुसंस्कृत आहे. या भूमीवर सांस्कृतिक विविधता आहे. मात्र, चांगल्या जनतेवर वाईट लोक राज्य करतात, असे दिसले. येथील सरकारकडे तर आता कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठीही पैसे नाहीत, एवढे प्रशासन कोलमडले आहे.

आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिषी मारलेना
Goa Politics: भाजपला बंडखोरांची धास्ती

त्यांनी सांगितले, राज्यातील छोट्या पक्षांशी आघाडी करून विधानसभा निवडणुकीला सामोरे जायचे का याचा निर्णय पक्ष येणाऱ्या काळात घेईल मात्र भाजप आणि कॉंग्रेससोबत आघाडी केली जाणार नाही हा पक्षाचा धोरणात्मक निर्णय आहे.

राज्याचा विकास होण्याऐवजी राजकारण्यांचा विकास झाला असा शेरा मारून त्या म्हणाल्या, दिल्लीतील निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवाल यांच्याविषयी सर्वांनाच माहिती नव्हती, तसे राज्यपातळीवर आता अनेक नेते पुढे येत आहेत, आलेले आहेत. राज्याचे नेतृत्व कोणाकडे असावे हे जनताच ठरवेल.

लोक सक्षम पर्यायाच्या शोधात

आमच्याकडे फारतर दोनेक हजार कार्यकर्ते असतील; पण राजकारण स्वच्छ मोहिमेत आज सकाळपर्यंत सत्तर हजार जण शपथबद्ध झाले आहेत. याचा अर्थ लोक पर्यायाच्या शोधात असून तो पर्याय आम आदमी पक्ष आहे. राज्यात उद्योगशीलता विकसित करण्यास वाव आहे. आरोग्य यंत्रणा, रस्ते, पाणीपुरवठा, वीजपुरवठा यात सुधारणा करण्यास बराच वाव आहे. मी दोन वर्षांपूर्वी विमानतळावरून पणजीला येताना एका रस्त्याचे काम सुरू असल्याचे पाहिले होते, आजही त्या रस्त्याचे काम सुरूच आहे. आम्ही येथील राजकारण बदलून लोकांची जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. ही निवडणूक तर आप सरकार स्थापनेसाठीच लढवणार आहे, असे त्या म्हणाल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com