काणकोण (Canacona) मतदार संघातील सहा पंचायतीत रविवारी 11 जुलैला लाडली लक्ष्मी योजनेची (Ladli Lakshmi Yojana) समंती पत्रे लाभधारकांना उपसभापती इजिदोर फर्नांडीस (Ejidor Fernandes) यांच्या हस्ते वितरीत करण्यात आली. लाभधारकांना प्रत्येकी एक लाख रूपये म्हणजे 174 लाभधारकांना 1 कोटी 74 लाख रूपये मिळणार आहेत. लोलये पंचायत क्षेत्रातील 18 पैंगीण पंचायत क्षेत्रातील 30 खोतीगाव पंचायत क्षेत्रातील 14 गावडोंगरी पंचायत क्षेत्रातील 29 श्रीस्थळ पंचायत क्षेत्रातील 17, तसेच आगोंद पंचायत क्षेत्रातील 22 लाभधारकांना ही समंती पत्रे प्रदान करण्यात त्याशिवाय.
सोमवारी सकाळी 11.30 वाजता पालिका क्षेत्रातील 38 व अन्य भागातील 6 लाभधारकांना उपसभापतीच्या चावडी येथील कार्यालयात लाभधारकांना ही पत्रे देण्यात येतील.पैगीण पंचायत क्षेत्रात आयोजित कार्यक्रमाला उपसभापती इजिदोर फर्नांडीस,सरपंच जगदीश गावकर,उपसरपंच एल्डा फर्नाडीस (Alda Fernandes) पंच रूद्रेश नमशीकर,सरिता पागी भाजप मंडळ अध्यक्ष नंदीप भगत,सचिव दामोदर च्यारी,सुरज कोमरपंत उपस्थित होते.
भाजप सरकारने करोना काळात (Covia 19) व्यवसायाला मुकावे लागलेल्या सर्व व्यावसायिकांना प्रत्येकी पांच हजार रूपयाची सानुग्रह मदत देण्याचे ठरविले आहे.काणकोणमधील मोटार सायकल पायलट,रिक्शा चालक,प्रवासी बस गाड्याचे चालक व वाहकांना प्रत्येकी 10 हजार रूपयांची आर्थीक मदतीसाठी 70 लाख रूपयाच्या निधीचे वितरण केले आहे. मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी राज्य करोनामुळे आर्थीक संकटात असूनही राज्यातील जनतेच्या हितासाठी हा निर्णय घेऊन कार्यवाही सुरू केली असल्याचे उपसभापतीनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.