Goa And World Bank MoU: 1650 कोटींच्या हवामान निधीसाठी गोव्याचा करार

Goa Weather Department: राज्य सरकारने तब्बल 1650 कोटी रुपयांचा मिश्र वित्तीय सुविधेअंतर्गत हवामान निधी स्थापन करण्यासाठी आज जागतिक बॅंकेसोबत भागीदारी केली.
Goa And World Bank MoU
Goa And World Bank MoU

Goa And World Bank MoU

राज्य सरकारने तब्बल 1650 कोटी रुपयांचा मिश्र वित्तीय सुविधेअंतर्गत हवामान निधी स्थापन करण्यासाठी आज जागतिक बॅंकेसोबत भागीदारी केली. केंद्रीय अर्थव्यवहार खात्याने मंजुरी दिल्यानंतर हा निधी प्रत्यक्षात येणार आहे.

यासाठी राज्य सरकारच्या पर्यावरण खात्याने आज नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (नाबार्ड), भारतीय लघु उद्योग विकास बँक यासह पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन तसेच प्रमुख वित्तीय संस्थांसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह जागतिक बँकेच्या हवामान बदल कार्यक्रमविषयक जागतिक संचालिका जेनिफर सारा, पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा आदी उपस्थित होते.

दोनापावला येथील एका सप्ततारांकीत हॉटेलात यानिमित्ताने दोन दिवसीय परिषदेचे आयोजन जागतिक बॅंकेच्या सहकार्याने करण्यात आले आहे. या परिषदेत या निधी स्थापनेची घोषणा करण्यात आली. जागतिक बॅंकेकडून अशी वित्तीय मदत मिळवणारे गोवा हे पहिले राज्य ठरले आहे.

Goa And World Bank MoU
Goa News: नेसाय दगडफेकप्रकरणी 19 जणांविरोधात गुन्हा

मिश्रित वित्त गुंतवणुकीतून लाभ मिळवण्यासाठी निश्चित केलेल्या प्रमुख क्षेत्रांमध्ये ई-गतिशीलता, अक्षय ऊर्जा, जैवविविधता संवर्धन, किनारी संरक्षण आणि हरित पर्यटन यांचा समावेश आहे. दोन दिवसांपूर्वी नीती आयोगासमोर या निधीसंदर्भात सादरीकरण करण्यात आले होते.

गोव्यात कमी-कार्बन आणि हवामान-प्रतिरोधक गुंतवणुकीची अंमलबजावणी करण्यासाठी सवलतीच्या वित्तीय सुविधेत प्रवेश आणि एकत्रित करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

ज्यामुळे भारतातील इतर किनारी राज्यांसाठी हा अभूतपूर्व उपक्रम एक उदाहरण ठरणार आहे, असे या परिषदेत सांगण्यात आले.

Goa And World Bank MoU
Illegal Construction: सरकारची ‘बे’कायदा मक्‍तेदारी; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

भारतीय हवामान आणि विकास या संकल्पनेवर आधारीत ही परिषद आहे. ही परिषद हवामान क्षेत्रातील विचारसरणीचे नेते आणि बदल घडवणाऱ्यांसाठी एक व्यासपीठ म्हणून काम करते.

निधीची ही सुविधा दुहेरी भूमिका बजावण्यासाठी तयार करण्यात आली आहे. पहिले - विद्यमान निधी किंवा प्रस्थापित व्यावसायिक व्यवहार्यता असलेल्या प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्यासाठी साहाय्य करणे आणि दुसरे - विद्यमान निधी किंवा अनाकर्षक जोखीम/रिटर्न प्रोफाईल नसलेल्या प्रकल्प आणि क्षेत्रांना वित्तपुरवठा करणे.

देशांतर्गत भांडवली बाजारासह हरित वित्तपुरवठा यंत्रणेला जोडून, ​​सुविधेचे उद्दिष्ट हवामान कृतीसाठी खासगी भांडवली गुंतवणूक आकर्षित करणे आहे. ज्यामुळे शाश्वत आणि लवचीक भविष्याकडे संक्रमण सुलभ होणार आहे.

जागतिक बॅंकेचे दक्षिण आशिया क्षेत्र हवामान बदल आणि जागतिक बँकेतील आपत्ती जोखीम व्यवस्थापन व्यवस्थापक आभास के. झा यांनी सुविधेची मापनक्षमता अधोरेखित केली आणि भारतातील उप-राष्ट्रीय स्तरावर त्याची पुनरावृत्ती आणि विस्तार करण्याच्या क्षमतेवर भर दिला.

ग्रीन ग्रोथ अनलॉक करण्यासाठी, नवीन नोकऱ्या निर्माण करण्यासाठी आणि शाश्वत विकास चालविण्यासाठी मिश्रित वित्ताद्वारे सादर केलेली संधी त्यांनी अधोरेखित केली. ते म्हणाले, या सुविधेमध्ये उप-राष्ट्रीय स्तरावर भारतात प्रतिकृती बनवण्याची आणि वाढवण्याची क्षमता आहे.

यामुळे सार्वजनिक हिताला बळकटी देण्यासाठी खासगी नफ्याला मदत होते आणि हरित विकासाला निधी देण्यासाठी आणि नवीन निर्मितीसाठी मल्टी-ट्रिलियन-डॉलरची संधी अनलॉक करण्यात मदत होते.

केवळ निमंत्रितांसाठी असलेल्या या परिषदेतील चर्चांमध्ये हवामान वित्तपुरवठा, शाश्वत शीतकरण, समुदायाच्या नेतृत्वाखालील लवचिकता आणि किनारपट्टीवरील लवचिकता यासारख्या विषयांचा समावेश आहे.

संतुलित गोव्यासाठी लवचिकता ः मुख्यमंत्री

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी परिषदेत गोव्याचे संतुलन आणि समृद्धीचे स्वप्न साध्य करण्यासाठी लवचिकतेच्या महत्त्वावर भर दिला. नियोजन, गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांमध्ये लवचिकता अंतर्भूत करण्यासाठी मिश्रित वित्त सुविधेची भूमिका त्यांनी अधोरेखित केली. ही मिश्रित वित्त सुविधा आम्हाला अधिक सक्षम करेल. आम्ही आमच्या समुदायांना नवीन तंत्रज्ञान आणि व्यवसाय मॉडेल्ससह सशक्त बनविण्यास उत्सुक आहोत, जे हवामान बदलाला आमच्या प्रतिसादात महत्त्वपूर्ण ठरतील, असे त्यांनी सांगितले.

सहकार्यास जागतिक बँक वचनबद्ध ः सारा

जेनिफर सारा म्हणाल्या, जागतिक बँकेने हवामान-संवेदनशील प्रकल्पांसाठी मिश्रित वित्त नवकल्पनांच्या परिवर्तनीय संभाव्यतेवर भर दिला आहे. ही नवकल्पना उच्च-जोखीम प्रकल्पांना एकत्रित करण्यास मदत करू शकतात.

आम्ही गोव्यासोबत हवामान-प्रतिबंधक गुंतवणुकीची अंमलबजावणीस उत्सुक आहोत. तेथील लोकांचे आणि पर्यावरणाचे कल्याण अभिप्रेत आहे. गोव्यातील लोकांच्या आणि पर्यावरणाच्या कल्याणासाठी शाश्वत गुंतवणूक लागू करण्यासाठी गोव्यासोबत सहकार्य करण्यास जागतिक बँक वचनबद्ध आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com