Goa News: नेसाय दगडफेकप्रकरणी 19 जणांविरोधात गुन्हा

Goa News: शिवपुतळ्यावरून वाद : दंगलीचा आरोप
Goa Police
Goa PoliceDainik Gomantak
Published on
Updated on

Goa News: सां जुझे द आरियल (नेसाय) येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्‍थापन केल्‍यामुळे काल गावात निर्माण झालेला तणाव आज काहीसा निवळला असला तरी हे प्रकरण आणखी हाताबाहेर जाऊ नये यासाठी या भागात कडक पोलिस बंदोबस्‍त ठेवण्‍यात आला आहे.

त्‍यामुळे या भागाला आज काहीसे छावणीचे स्‍वरूप आले होते. याच पार्श्वभूमीवर मायणा-कुडतरी पोलिसांनी आज 19 अज्ञात व्‍यक्‍तींविरुद्ध बेकायदेशीर जमाव जमविणे आणि दंगल करण्‍याच्‍या आरोपाखाली गुन्‍हा नोंद केला आहे.

दरम्‍यान, वेळ्‍ळीचे आमदार क्रूझ सिल्‍वा यांनी आज दक्षिण गोव्‍याचे जिल्‍हाधिकारी अश्वीन चंद्रू यांची भेट घेऊन घटनास्‍थळी कायदा व सुव्‍यवस्‍था बिघडू नये यासाठी जिल्‍हा प्रशासनाने योग्‍य ती काळजी घ्‍यावी अशी मागणी केली.

या शिवपुतळ्‍याला एक चीर जरी गेली तर आम्‍ही गावकऱ्यांची गय करणार नाही. अशा आशयाची धमकी बजरंग दलाच्‍या एका कार्यकर्त्याने दिल्‍याने आज नेसाय दगडफेक प्रकरणी 19 जणांविरोधात गुन्हा

Goa Police
Anjuna Illegal Construction: सरकारची ‘बे’कायदा मक्‍तेदारी; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

आपण जिल्‍हाधिकाऱ्यांची भेट घेतली, अशी माहिती सिल्‍वा यांनी ‘गोमन्‍तक’ला दिली. ते म्‍हणाले, ज्‍या ठिकाणी हा पुतळा उभारण्‍यात आला आहे ती अगदी निर्जन जागा असून त्‍या ठिकाणी दिवाबत्तीची सोय नसल्‍याने काळोखाचे साम्राज्‍य असते.

अशा स्‍थितीत उद्या कुणीही मुद्दामहून त्‍या पुतळ्‍याची विटंबना केल्‍यास त्‍याचा आळ गावकऱ्यांवर येऊ शकतो. त्‍यामुळेच आपण त्याकडे जिल्‍हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे. या पुतळ्‍याला संरक्षण देण्‍याची जबाबदारी प्रशासनाची असून प्रशासनाने आपली भूमिका समर्थपणे निभावावी अशी आमची इच्‍छा आहे.

Goa Police
Goa News: पर्वरीत सर्वात उंच 21 फुटी शिवपुतळा

दरम्यान सां जुझे द आरियल येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्‍यावरून जो वाद झाला आहे, त्‍यावर ‘प्रश्न पुतळा उभारण्‍याचा नाही, तर तिथे झालेल्‍या बेकायदेशीर कृतीचा आहे’, असे मत गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनी व्यक्त केले. काल या धक्‍काबुक्‍कीत गोवा फॉरवर्डचे पदाधिकारी फ्रेडी त्रावासो जखमी झाले होते.

रविवारी ग्रामसभा

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यावरून नेसाय येथे वातावरण तंग झालेले असताना यावर चर्चा करण्यासाठी सां जुझे द आरियल पंचायतीने २५ रोजी विशेष ग्रामसभा बोलावली आहे. ग्रामस्थांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची विनंतीही पंचायतीने सरकारला केली आहे. मंत्री सुभाष फळदेसाई यांच्यावर काल तेथे मातीफेक करण्यात आली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com