Free Electricity: 400 युनिटपर्यंत मिळणार मोफत वीज! CM सावंतांची घोषणा; कशी कराल नोंदणी? जाणून घ्या..

Goa 400 units free electricity: ‘मुख्यमंत्री मोफत वीज’ योजनेअंतर्गत दरमहा ४०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची सोय करण्यात आली आहे.
CM Pramod Sawant
CM Pramod Sawant Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : गोमंतकीय जनतेला ४०० युनिट मोफत वीज देणारी योजना आता गाव पातळीवर नेण्यात येणार आहे. या योजनेची माहिती मंत्री, आमदार व जिल्हा पंचायत सदस्यांना देण्यासाठी आयोजित जनजागृती शिबिरात या योजनेची शिबिरे पंचायत पातळीवर आयोजित केली जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.

नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारी योजना प्रत्यक्ष अंमलबजावणीत आली आहे. ‘मुख्यमंत्री मोफत वीज’ योजनेअंतर्गत दरमहा ४०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची सोय करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ अधिकाधिक घरांपर्यंत पोहोचावा यासाठी राज्यभरात पंचायत पातळीवर नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.

यावेळी केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, मत्स्योद्योगमंत्री नीळकंठ हळर्णकर, आमदार दिगंबर कामत, खासदार सदानंद शेट तानावडे तसेच जिल्हा पंचायत सदस्य उपस्थित होते.

५० टक्के घरांवर बसवणार सौर उपकरणे

‘पीएम सूर्य घर’ योजना व ‘मुख्यमंत्री मोफत वीज’ योजना यांचा उद्देश प्रत्येक गोमंतकीय कुटुंबाला हरित आणि मोफत ऊर्जा उपलब्ध करून देण्याचा आहे. राज्यातील ५० टक्के घरांच्‍या छतावर सौर उपकरणे बसवण्याचे उद्दिष्ट आहे. शेतकऱ्यांसाठी ‘पीएम-कुसुम’ योजनेंतर्गत मोफत सौरपंपही देण्यात येत आहेत. या शिबिरांद्वारे लोकांना सुलभपणे नोंदणी करता यावी, तसेच घरांच्या छतांवर सौरऊर्जेच्या उपकरणांची उभारणी करून त्याचा थेट लाभ मिळावा यासाठी शासन सज्ज झाले आहे, असे मुख्यमंत्री म्‍हणाले.

CM Pramod Sawant
Goa Electricity Rate: गोमंतकीयांना बसणार वीज दरवाढीचा शॉक! वीजमंत्री ढवळीकरांनी दिली माहिती; प्रतियुनिट किती होणार वाढ? वाचा

योजनेचा लाभ कसा मिळवाल?

मुख्‍यमंत्री मोफत वीज योजनेअंतर्गत गेल्‍या वर्षभरात ग्राहकांनी प्रतिमहिना ४०० युनिटपेक्षा कमी वीज वापरलेली असली पाहिजे.

ग्राहकाने विहित नमुन्‍यात अर्ज केल्‍यानंतर गोवा ऊर्जा विकास यंत्रणेच्‍या माध्‍यमातून ग्राहकाच्‍या घराच्‍या छतावर पूर्णत: मोफत सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्‍यात येईल.

या योजनेची मुदत दहा वर्षे असेल. ग्राहकाने मासिक ४०० युनिटपेक्षा कमी वीज वापरल्‍यास त्‍याला कोणत्‍याही प्रकारचे बिल येणार नाही.

मात्र ४०० युनिटपेक्षा जास्‍त वीज वापरल्‍यास पहिल्‍या ३०० युनिटसाठी बिल येणार नाही. उर्वरित युनिटचे बिल भरावे लागेल.

ग्राहकाने आपला ग्राहक क्रमांक दिल्‍यावर त्‍याला वर्षभराची बिले वीज खात्‍याकडून मिळू शकतील.

CM Pramod Sawant
Goa: गोव्यातील 2 गावे होणार Model Solar Village! सौर ऊर्जेने होणार प्रकाशित; 48 गावांचे सर्वेक्षण

डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

सदर योजनेमुळे गोवा हे सौरऊर्जेचा पुरेपूर वापर करणारे देशातील अग्रगण्य राज्य ठरणार आहे. पंचायत स्तरावरील शिबिरांची तारीख आणि वेळ लवकरच जाहीर करण्यात येईल. नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com