
पणजी: गोवा सरकारच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा विभागाने राज्यातील दोन गावांची निवड ‘मॉडेल सोलर व्हिलेज’ योजनेसाठी करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आणली आहे. ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सूर्य तेज - राष्ट्र उत्कर्ष’ या दृष्टिकोनातून प्रेरित आहे. केंद्र सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली ही योजना राबवली जात आहे.
गोवा राज्य नवीकरणीय ऊर्जा विकास संस्थेमार्फत ही योजना अमलात आणली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या गावांमध्ये सौरऊर्जेचा अधिकाधिक वापर, जनजागृती, तसेच ऊर्जा बचतीस प्रोत्साहन देणारे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. या उपक्रमामुळे पर्यावरणपूरक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास गेडा आणि नवीन व नवीकरणीय ऊर्जा विभागाने व्यक्त केला आहे.
राज्य सरकारने यासाठी आधी पाच हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या ४८ गावांचे सर्वेक्षण केले होते. त्यातून कोरगाव, धारगळ, चोडण, थिवी, एला, करमळी, लाटंबार्से, मये, बेतोडा, शिरोडा, दाबोळी, लोटली, वेळ्ळी, खोला आणि पैंगीण या गावांचा विचार सौर गाव या योजनेसाठी केला जात आहे.
१. नियोजित गावांमध्ये सौरऊर्जेवर चालणारे पथदीप, घरगुती सौर पॅनल, सौर कुकर व तत्सम साधनांचा वापर वाढवण्यात येणार आहे.
२. सौरऊर्जेचे फायदे आणि पर्यावरण संवर्धन याविषयी जनजागृती मोहिमा राबवण्यात येतील.
३. ग्रामपंचायती, स्थानिक शाळा, स्वयंसेवी संस्था यांच्या सहभागाने योजना प्रभावीपणे राबविणार.
गावांच्या ऊर्जा गरजा भागवण्यासाठी स्वयंपूर्णता साधणे.
कोळसा, डिझेल यांसारख्या पारंपरिक ऊर्जा स्रोतांवरील अवलंबित्व कमी करणे.
हरितगृह वायूंचे प्रमाण घटविणे आणि पर्यावरण संतुलन राखणे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.