Goa Electricity Rate: गोमंतकीयांना बसणार वीज दरवाढीचा शॉक! वीजमंत्री ढवळीकरांनी दिली माहिती; प्रतियुनिट किती होणार वाढ? वाचा

Goa Electricity Bills: राज्‍यात सुरू असलेल्या प्रगत दर्जाच्या वीजविकास प्रकल्पांमुळे ही दरवाढ अपरिहार्य असल्याचे ढवळीकर यांनी सांगितले.
Sudin Dhavalikar, Goa electricity rate hike
Sudin DhavalikarDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यातील वीजदरात लवकरच प्रतियुनिट ५ पैसे ते २५ पैशांपर्यंत वाढ होऊ शकते, अशी माहिती वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली. ही वाढ घरगुती वापरासाठी ५ पैसे तर व्‍यावसायिक ग्राहकांसाठी २५ पैसे इतकी असेल.

राज्‍यात सुरू असलेल्या प्रगत दर्जाच्या वीजविकास प्रकल्पांमुळे ही दरवाढ अपरिहार्य असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्‍यान, ९ मे रोजी सकाळी १० वाजता येथील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा संस्‍थेच्‍या सभागृहात यासंदर्भात जॉईंट इलेक्ट्रिसिटी रेगुलेटरी कमिशनची (जेईआरसी) सार्वजनिक सुनावणी होणार आहे.

Sudin Dhavalikar, Goa electricity rate hike
Electricity Rates Hike: गोमंतकीयांना ऐन उन्हाळ्यात बसणार वीज दरवाढीचा झटका? 5.95% वाढीचा प्रस्‍ताव, 9 मे रोजी सुनावणी

जेईआरसीच्या नियमानुसार दरवर्षी वीज विभागाला आर्थिक ऑडिट करावे लागते. त्यात उघडकीस आलेल्या तोट्याची भरपाई करणे आवश्यक असते. गोव्यात सध्या सुरू असलेली कामे ही इतकी दर्जेदार आहेत की त्यामुळे आम्ही ‘बी’ वर्गातून ‘ए’ वर्गात पोहोचलो आहोत, आणि आता ‘ए+’ वर्गात समाविष्ट होण्यासाठी तयारी सुरू आहे, असे ढवळीकर म्‍हणाले.

Sudin Dhavalikar, Goa electricity rate hike
Gold Rate: सोन्याच्या किमतीचा नवा रेकॉर्ड! 88 हजारांचा टप्पा ओलांडला, एका दिवसात 2,430 रुपयांची वाढ

जर ५ पैसे वीजदरवाढ झाली तर ती फार मोठी नसेल. आपण जेवढा दर्जेदार विकास करत आहोत, त्याची किंमत लोकांनी थोडीशी चुकती केली पाहिजे असे सांगत मंत्र्यांनी दरवाढीला नैसर्गिक परिणाम मानले. त्यांनी यासोबतच स्पष्ट केले की, गोवा स्वतः वीज उत्पादन करत नाही, तर इतर राज्यांकडून वीज खरेदी करते. त्यामुळे दरवाढ ही इतर राज्यांच्या तुलनेत खूपच कमी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com