Goa Politics: सावर्डे मतदारसंघाचा विकास हेच ध्येय; गणेश गावकर

सावर्डे मतदारसंघाचा पूर्ण विकास करणे हे आपले ध्येय आहे,असे प्रतिपादन आमदार गणेश गावकर यांनी स्वातंत्र्य दिन सोहळ्यात ध्वजारोहण केल्यानंतर केले
Goa Politics
Goa PoliticsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

सावर्डे मतदारसंघाचा पूर्ण विकास करणे हे आपले ध्येय आहे,असे प्रतिपादन आमदार गणेश गावकर यांनी स्वातंत्र्य दिन सोहळ्यात ध्वजारोहण केल्यानंतर नागरिकांना मार्गदर्शन करताना केले.

Goa Politics
E-Cigarette: ‘ई-सिगारेट’ म्हणजे काय? विद्येच्या मंदिरामध्येही ‘ई-सिगारेट’चा शिरकाव

भावी पिढीच्या उत्कर्षासाठी शिक्षणावर भर देणे आवश्‍यक असल्याचे गावकर यावेळी म्हणाले. पुढील १५ दिवसांत स्वयंपूर्ण गोवा योजनेखाली ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी करियर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

त्या अनुषंगाने जीपीएससी, यूपीएससी या परीक्षा, तसेच बँक, रेल्वे मंडळ यांच्या परीक्षांसाठी ऑनलाईन मार्गदर्शन देण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली. यासारख्या अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांना आयएएस, आयपीएस, आयएफएस अशा उच्च पदांसाठी प्रयत्न करण्यात मार्गर्शन लाभणार आहे असे ते म्हणाले.

Goa Politics
Goa Student: शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि आव्‍हाने

त्याआधी उपजिल्हाधिकारी नीलेश धायगोडकर यांनी गावकर यांचे स्वागत केले. यावेळी आमदार गणेश गावकर यांनी पोलिसांकडून मानवंदना स्वीकारली. सूत्रसंचालन जितेंद्र नाईक यांनी केले.

पर्यटनदृष्ट्या विकासातून दीड हजार रोजगार !

सावर्डे मतदारसंघातील पर्यटन क्षेत्रातील पुढील प्रकल्पांविषयी आमदार गणेश गावकर यांनी माहिती दिली. त्यात तांबडी सुर्लमधील महादेव मंदिर परिसराचे सौंदर्यीकरण, बोंडला प्राणी संग्रहालयाला विविध रस्त्यांनी जोडणे, मोले हेलीपॅड सेवा, दूधसागर परिसर यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्वांमुळे सुमारे १०००-१५०० रोजगार निर्माण होतील याकडे त्यांनी लक्ष वेधले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Kashti Kale Drain Pollution
Goa Political Meetings During Ganesh Chaturthi
Goa Ganesh Immersion Safety 2026
Ganesh Chaturthi Spiritual Significance Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com