E-Cigarette: ‘ई-सिगारेट’ म्हणजे काय? विद्येच्या मंदिरामध्येही ‘ई-सिगारेट’चा शिरकाव

धोक्याची घंटा : या स्थितीला जबाबदार कोण ?
 Bicholim School
Bicholim SchoolDainik Gomantak
Published on
Updated on

सिगारेट ओढणे आरोग्यास अपायकारक असल्याचे कानी कपाळी ओरडूनही फरक पडत नाही,असेच एकंदर चित्र आहे. या व्यसनाच्या घातक बाबीने विद्येच्या प्रांगणातही शिरकाव केला आहे. प्रचलित सिगारेटची जागा आता ई-सिगारेटनी घेतली आहे. व्हेप-सिगारेट नाव नवीन नसले तरी विद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये ती बऱ्यापैकी परिचित आहे.

 Bicholim School
Online Cricket Betting: पर्वरीत क्रिकेट सट्टेबाजीचा पर्दाफाश; 12 जणांना अटक

अशातच, डिचोली येथील शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयात अकरावी वर्गातील एका 15 वर्षीय मुलीच्या बॅगेमध्ये ही दोन ई-सिगारेट (व्हेप पेन) सापडली. अशी आक्षेपार्ह वस्तू विद्यार्थिनीच्या बॅगेत आढळल्याने शिक्षकांसह पालकांनाही धक्का बसला आहे. विद्येच्या मंदिरात सिगारेट्स पोहचल्याने या प्रकरणास पालक, शिक्षक, विद्यार्थी की परिस्थिती, नक्की जबाबदार कोण? हा प्रश्न उपस्थित करून चिंता व्यक्त केली जात आहे.

काय घडलं तेव्हा...

उपलब्ध माहितीनुसार, गुरुवारी 17 रोजी सकाळी मधली सुट्टी झाल्यानंतर, वर्ग सुरू झाला. यावेळी अकरावी ‘अ’च्या कला वर्गातील काहींना अस्वस्थ वाटू लागले. यावेळी, शिक्षिकेने वर्गात प्रवेश करताच त्यांनी विद्यार्थ्यांना कसला तरी वास येतोय का? असे विचारले. परंतु, मुलांनी नाही म्हणून उत्तर दिले. परंतु वर्ग सुरू होताच दहा मिनिटांत काही मुलींना अस्वस्थ वाटू लागले व त्यांना घशात जळजळ व श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे या विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर आणले. मात्र विद्यार्थिनींची तब्येत बिघडल्याचे पाहून त्यांना विद्यालयातील शिक्षकांनी इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने खासगी वाहनांमधून तत्काळ डिचोली आरोग्य केंद्रात हलविले, तेथून काहींना जास्त त्रास होऊ लागल्याने संबंधितांना म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल केले.

 Bicholim School
Goa Police: स्कूटरच्या बुकिंगचे आमिष; 300 हून अधिक ग्राहकांची फसवणूक, ठकसेनला गोव्यात अटक

विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर

सध्या या विद्यार्थिनींची तब्येत स्थिर असून, त्यांना दवाखान्यातून डिस्चार्ज दिला आहे. या घटनेची त्वरित माहिती पोलिसांना व्यवस्थापनास दिली. ज्या वर्गात हा कथित प्रकार घडला तेव्हा वर्गात जवळपास ५० विद्यार्थी होते. यामध्ये मुलेही होती. परंतु, खिडकीच्या बाजूने शेवटच्या बाकावर बसलेल्या काही मुलींनाच श्वसनाचा हा त्रास प्रामुख्याने जास्त झाला, अशी माहिती मिळाली आहे.

‘ई-सिगारेट’ म्हणजे काय रे भाऊ !

इलेक्ट्रॉनिक सिगारेट, ज्याला सामान्यतः ई-सिगारेट म्हटले जाते, २०१९मध्ये भारत सरकारने ई-सिगारेट प्रतिबंध कायदा २०१९अंतर्गत या वस्तूचे उत्पादन, आयात, निर्यात, वितरण, साठवण आणि जाहिरातीवर पूर्णपणे बंदी घातली.

ई-सिगारेट किंवा व्हेप पेन हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण असते, ज्यामध्ये प्रत्यक्ष तंबाखू नव्हे तर त्यातील निकोटीन द्रवरूपात असते. ही सिगारेट पेटवण्यासाठी उपकरणातच एक बॅटरी असते, जी सिगारेटमधील द्रवरूपात असलेल्या निकोटीनचे वाफेत रूपांतर करते. ई-सिगारेट ओढल्यानंतर त्याचा धूर होत नसून थेट वाफ आतमध्ये ओढली जाते.

ई-सिगारेटमध्ये डायथिलीन ग्लायकोल नावाचे घातक रसायन असते, जे लहान मुले आणि तरुण दोघांसाठी हानिकारक असते. याच्या नियमित वापरणे श्वसनाचा त्रास होऊ शकतो. ई-सिगारेटमध्ये कार्सिनोजेनिक घटक आढळतात, ज्यामुळे कॅन्सरचा धोका असतो

ई-सिगारेटमध्ये निकोटीन असते, ज्याचा थेट परिणाम मेंदूवर होतो. सतत वापरत असेल तर व्यसनात रूपांतर होते.

व्यसन, फॅशन की पॅशन ?

विद्यार्थिनीच्या बॅगेत ई-सिगारेट सापडल्याने मुलांना कथित व्हेपचे व्यसन जडले आहे का? हा प्रश्नही उपस्थित होतो. मुळात, ई-सिगारेट्सना बंदी आहे. परंतु, धूम्रपनाचा हा आधुनिक प्रकार असलेल्या या ई-सिगारेट्स ऑनलाइन सहजरित्या उपलब्ध होतात. अशात, ही मुले व्यसन की फॅशन म्हणून या व्हेपचे झुरके घेतात? हा एक संशोधनाचा भाग. दरम्यान, सापडलेल्या या व्हेपमध्ये पेपर स्प्रे (मिरी) मिसळून कदाचित ती पीडित विद्यार्थिनींना घटनेच्या दिवशी ओढण्यास भाग पाडले का? की वर्गात हा व्हेप मुद्दामहून स्प्रे केला, या बाजूने तपास होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com