Goa Budget 2025: कधी जाहीर होणार गोव्याचा अर्थसंकल्प? मुख्यमंत्री सावंतांनी दिली माहिती

Goa Budget 2025: मंत्रालयात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागांसमवेत अर्थसंकल्पपूर्व बैठक पार पडली.
Goa Budget 2025: कधी जाहीर होणार गोव्याचा अर्थसंकल्प? मुख्यमंत्री सावंतांनी दिली माहिती
Goa CM Dr. Pramod SawantPramod Sawant X Handle
Published on
Updated on

Goa Budget 2025

पर्वरी: नव्या वर्षाची सुरुवात झाली आहे. गोवा विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख देखील जाहीर झालीय. नव्या वर्षात सर्वांचे लक्ष राज्याच्या अर्थसंकल्पाकडे लागलेले असते. कोणाला काय मिळणार? काय स्वस्त? काय महाग होणार हे जाणून घेण्यासाठी सर्व आतूर असतात. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्रालयात घेतलेल्या अर्थसंकल्पपूर्व बैठकीत सर्व संबधित खात्यांना महत्त्वपूर्ण सूचना देत अर्थसंकल्प केव्हा होणार याची देखील माहिती दिली.

आज मी मंत्रालयात गोवा सरकारचे मुख्य सचिव, सचिव आणि विभाग प्रमुख (HoDs) यांच्यासमवेत अर्थसंकल्पपूर्व बैठक घेतली. या महत्त्वपूर्ण बैठकीत राज्यासाठी संतुलित, दूरगामी अर्थसंकल्प तयार करणे आणि त्याची अंमलबजावणी करणे या प्रमुख बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात आले, अशी माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली.

Goa Budget 2025: कधी जाहीर होणार गोव्याचा अर्थसंकल्प? मुख्यमंत्री सावंतांनी दिली माहिती
Calangute Murder Case: कळंगुट पर्यटक खून प्रकरण; आणखी एका शॅक कामगारास अटक, संशयितांना 9 दिवसांची पोलिस कोठडी

चर्चेतील महत्वाचे मुद्दे

१) महसूल वाढवण्यासाठी नाविन्यपूर्ण मार्ग शोधून अंमलबजावणी करण्याची सूचना

२) वितरित केलेल्या बजेटचा प्रभावी वापर. अकार्यक्षमता टाळण्यासाठी विभागांनी संसाधनांचा प्रभावी आणि वेळेवर वापर सुनिश्चित करणे आवश्यक आहे.

३) सर्व विभाग, सहकारी आणि स्वायत्त संस्थांना स्वयंपूर्णता आणि महसूल वाढीसाठी विद्यमान संसाधनांचा वापर करुन नवी धोरणे शोधण्याचे निर्देश.

Goa Budget 2025: कधी जाहीर होणार गोव्याचा अर्थसंकल्प? मुख्यमंत्री सावंतांनी दिली माहिती
Tiswadi Crime: 31st च्या पार्टीसाठी मित्राच्या घरी गेलेल्या 14 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; 22 वर्षीय युवकाला अटक

कधी जाहीर होणार गोव्याचा अर्थसंकल्प?

गोव्याचा अर्थसंकल्प येत्या मार्चमध्ये जाहीर होईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. दरम्यान, त्यापूर्वी ०६ फेब्रुवारीपासून विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. विधानसभेत नोकरी घोटाळा, सुलेमान खान फरार प्रकरण जोरदार गाजण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com