Tiswadi Crime: 31st च्या पार्टीसाठी मित्राच्या घरी गेलेल्या 14 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; 22 वर्षीय युवकाला अटक

Goa Crime News: मुलगी घरी माघारी न आल्याने तिच्या नातेवाईकांनी जुने गोवा पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.
Tiswadi Crime: 31st च्या पार्टीसाठी मित्राच्या घरी गेलेल्या 14 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; 22 वर्षीय युवकाला अटक
Goa Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Crime News

पणजी: मित्राच्या घरी ३१ डिसेंबर रोजी पार्टीसाठी गेलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जुने गोवा पोलिसांनी २२ वर्षीय युवकाला अटक केली आहे. युवकाने अपहरण करुन अत्याचार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी ३१ डिसेंबर रोजी मित्राच्या घरी पार्टीसाठी घरातून बाहेर गेली होती. मुलगी घरी माघारी न आल्याने तिच्या नातेवाईकांनी जुने गोवा पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करुन तात्काळ शोध सुरु केला. शोध घेत असताना पोलिसांना मुलगी आणि एक युवक सोबत सापडले.

Tiswadi Crime: 31st च्या पार्टीसाठी मित्राच्या घरी गेलेल्या 14 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; 22 वर्षीय युवकाला अटक
ED Goa: ईडीची गोव्यात मोठी कारवाई; बेकायदेशीर खाण उत्खनन प्रकरणी 1.2 लाख चौरस मीटर जमीन घेतली ताब्यात

पोलिसांनी दोघांचीही वैद्यकीय तपासणी केली असता मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी पीडित मुलीची सुटका करुन संशयित युवकाला अटक केली. त्याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता आणि गोवा बाल कायद्याच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. जुने गोवा पोलिस अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa NCRB Crime Report
Man Cuts Private Part Temple
Curchorem Crime Case
Indore Youth Death in Anjuna Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com