वाडे तळ्यातील दूषित पाण्यामुळे नागरिंकामध्ये रोगराई पसरण्याची भिती

मुरगाव नगरपालिकेने (Murgaon Municipality) वाडे तळ्यावर दुर्लक्ष केल्याने सदर परिस्थिती उद्भवली असल्याचे लोकांनी मत व्यक्त केले आहे.
Wade
Wade Dainik Gomantak

वाडे तळ्याचे पाणी दूषित झाल्याने येथे रोगराई पसरण्यास सुरुवात झाली असून डेंगू (Dengue) सारख्या रोगाने डोके वर काढल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच भाडे तळ्यच्या बाजूस असलेल्या इमारतीचे सांडपाणी तळ्यात येत असल्याने व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे (National Highways Authority) चाललेल्या गटार काम अर्धवट स्थितीत असलेल्या गटारातील पाणी सुद्धा तळ्यात जात असल्याने तळ्याचे पाणी पूर्णपणे दूषित झाले आहे. मुरगाव नगरपालिकेने (Murgaon Municipality) वाडे तळ्यावर दुर्लक्ष केल्याने सदर परिस्थिती उद्भवली असल्याचे लोकांनी मत व्यक्त केले आहे. तळ्याचा लवकरच पालिकेने ताबा घेऊन त्याची पालिकेतर्फे देखबाल व्हावी अशी मागणी लोकांकडून होत आहे.

येथील मूरगाव नगरपालिकेच्या हद्दीत येत असलेल्या वाडे तळ्याच्या सौंदर्यीकरण करण्याचे काम करून तीन वर्षे उलटली. मात्र याचा ताबा कोणाकडे आहे यावर अजून शिक्कामोर्तब झाले नसल्याने मुरगाव नगरपालिका आणि चर्च संस्था यांच्यात सध्या घुमजाव सुरू आहे. तसे असले तरी सरकारी मालमत्तेवर एखादी संस्था आपला हक्क दाखवू शकत नाही.

Wade
Goa: 'व्हीएम' यांना क्रीडा संचालकपदी बढती

तळ्यावर चर्च संस्थेने आपला हक्क दाखवण्याचा कसोसिने प्रयत्न चालू केले असले तरी सूडा मार्फत लोकांच्या पैशाने बांधण्यात आलेल्या या सरकारी मालमत्तेचा हक्क सर्वप्रथम मुरगाव नगरपालिका क्षेत्रात असल्याने मुरगाव पालिकेला जातो. त्यानुसार तळ्याची देखबाल पालिकेने करणे क्रमप्राप्त आहे. चर्च संस्थेने या तळ्यावर आपला हक्क बजावून तळ्याच्या मधोमध सेंट ॲंड्रूजचा पुतळा उभा केल्याने येथील नागरिकांत नाराजीचा सूर उमटला आहे. मात्र राजकारणापुढे नागरिकांचे काहीएक चालत नाही तेवढेच सत्य आहे.

स्थानिक आमदार माविन गुदिन्हो (MLA Mavin Gudinho) यांनी याविषयी मौन बाळगले आहे. लोकार्पण करून आज तीन वर्षे उलटली तरी या तळ्याचा मालकी हक्क पालिकेकडे सोपविण्यास ते असमर्थ ठरले आहे. नगर विकास मंत्री मिलिंद नाईक यांनी याविषयी जातीने लक्ष घालून या तळ्याचा मालकीहक्क मूरगाव पालिकेकडे सोपवावा अशी मागणी जोर धरत आहे.

Wade
Goa: दुहेरी ट्रॅकसाठी कासावली येथील खांबांची बेकायदा उभारणी रोखली

दरम्यान सुमारे 14 कोटी खर्चून सुशोभीकरण करण्यात आलेल्या वाडे तळ्याचे काम सूडातर्फे करण्यात आले आहे. एकूण 6500 चौ.मी. जागेतील या तळ्याच्या सभोवताली 350 मीटर 'वॉकिंग ट्रॅक'आहे. तसेच तळ्याच्या मध्यभागी 3 म्युझिकल कारंजे बसविण्यात आले आहे. सध्या ते नादुरुस्त अवस्थेत आहे. पर्यावरणाचा विचार करून वाडे तळ्याची रचना करण्यात आली असली तरी सद्या वाडेतळे बकाल अवस्थेत आहे. वयस्कर लोकांना बसण्यासाठी खास सोय करण्यात आलेली आहे तसेच त्याच्या सभोवताली रेलिंग बसविण्यात आले आहे.

दरम्यान तळ्याचे सुशोभीकरण करून तीन वर्षे उलटले असून सदर तळे आजपर्यंत देखबालीपासून वंचित आहे. याचे मुख्य कारण म्हणजे हे तळे राजकीय विळख्यात सापडल्याने तसेच पडलेले आहे. या तळ्यातील पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे सर्व परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. याचे पाणी दूषित झाले असून त्यावर बुरशी निर्माण झाली आहे. खरं तर पावसाळ्यात या तळ्यातील पाणी स्वच्छ राहत होते.

Wade
Goa: पैकुळ सत्तरीत तातडीने पुल बांधावा; अन्यथा आंदोलन

मात्र सुशोभीकरण केल्यानंतर या तळ्याची मुख्य वाट तसेच दर्याच्या पाण्याची वाट बंद झाल्याने या तळ्याच्या पाण्याचा आणि दर्याच्या पाण्याचा संपर्क तुटल्याने तळ्यातील पाणी तसेच पाण्याचा निचरा होत नसल्याने या तळ्यातील पाणी दूषित झाले आहे. तळ्यातील पाण्यात बुरशीचा थर निर्माण झाल्याने तळ्याची बकाल अवस्था झाली आहे.

त्यामुळे दुर्गंधीयुक्त वातावरणात लोकांना वाट काढावी लागते. तसेच तेथे डासांची पैदास वाढत असल्याने लोकांमध्ये भिंतीचे वातावरण पसरले आहे. या दिवसात या दूषित पाण्यामुळे डेंगूचा फैलाव झाला आहे. आरोग्य खात्यातर्फे तळ्याच्या पाण्यावर उपाय योजना आखलेली नसल्याने लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तळ्याच्या सभोवताली लावण्यात आलेली झाडेही देखभाल न झाल्याने नष्ट झाली आहे.

Wade
Goa: कुठ्ठाळीचा विकास करण्यात स्थानिक लोकप्रतिनिधी अपयशी

दरम्यान हिंदुंच गणेश चतुर्थी सण जवळ येऊन ठेपला आहे. गणेश चतुर्थी काळात या तळ्यात दीड, पाच, सात, अकरा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यात येते. मात्र यंदा या तळ्यात बूर्शी निर्माण झाल्याने तसेच डेंग्यू वाढत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. पालिकेने या तळ्याची साफसफाई करून हे दूषित पाणी काढून टाकण्यासाठी बंद झालेले वाट मोकळी करावी. या पाण्याचा निचरा होण्यास मदत होईल तसेच ज्या तळ्यातील म्युझिकल कारंजे बंद असून त्याची डागडुजी होणे गरजेचे आहे. याविषयी नगर विकास मंत्री मिलिंद नाईक यांनी खास लक्ष घालणे गरजेचे असल्याचे नागरिकांकडून मागणी होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com