Goa: कुठ्ठाळीचा विकास करण्यात स्थानिक लोकप्रतिनिधी अपयशी

कुठ्ठाळी व इतर पंचायतीची विकास कामे माझ्या कारकिर्दीत झाली; पंचायत मंत्री गुदिन्हो (Goa)
Panchayat Minister Mauvin Godinho and other dignitaries inaugurating Sancoale's temporary panchayat (Goa)
Panchayat Minister Mauvin Godinho and other dignitaries inaugurating Sancoale's temporary panchayat (Goa)Dainik Gomantak

कुठ्ठाळीचा (Cortalim) सर्वांगीण विकास (Development) करण्यास स्थानिक लोकप्रतिनिधी मागे पडल्याने येथील पंचायतीने माझ्याजवळ संपर्क साधून विकास कामाची मागणी केली. पंचायत मंत्री या नात्याने संपूर्ण गोव्याचा विकास एवढेच ध्येय मी नजरेसमोर ठेवून कार्य करीत असून कुठ्ठाळी सांकवाळ व इतर पंचायतीत विकास कामे माझ्या कारकिर्दीत करण्यात आली होती अशी माहिती दाबोळीचे आमदार तथा पंचायत मंत्री माविन गुदिन्हो (Panchayat Minister Mauvin Godinho) यांनी दिली. (Goa)

Panchayat Minister Mauvin Godinho and other dignitaries inaugurating Sancoale's temporary panchayat (Goa)
गोव्यातील साओ जॅसिंटो बेटांकडे बघूनही वेदनेची कळ येणे गरजेचे; शिवसेना

साकवाळ पंचायतीच्या स्थलांतरित तात्पुरती पंचायत घराच्या उद्घाटन वेळी वरील माहिती पंचायत मंत्री गुदिन्हो यांनी दिली. यावेळी त्यांच्यासमवेत सांकवाळचे सरपंच रमाकांत बोरकर, उपसरपंच श्रीमती सुकोरिना वालीस, पंच गिरीश पिल्ले, हरीश कादर, गोविंद लमानी, डॉ. सुनीता बोरकर, माजी पंच आशा नाईक, जिल्हा पंचायत सदस्य अनिता थोरात, लिगोर मोंतेरो, पंचायतीचे सचिव कृष्णा गावडे, नवीन झा, विकास गवस व इतर मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना गुदिन्हो म्हणाले की सांकवाळ पंचायत कार्यालयाच्या खऱ्या अर्थाने आज पायाभरणी झाल्यासारखे आहे. पंचायत घर पूर्णपणे मोडकळीस येत असल्याने स्थानिक पंचायत सदस्याने माझ्याजवळ येऊन नवीन पंचायत घर पूर्ण साधनसुविधाने उपलब्ध करावे अशी मागणी केली. त्यानुसार सांकवाळ येथे लवकरच नवीन पंचायत बांधण्याच्या कामाचा शुभारंभ होणार आहे. लवकरच मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते नवीन पंचायतीला पायाभरणी केल्यानंतर पंडित दीनदयाळ उपाध्याय पायाभूत सुविधा अंतर्गत अंदाजे सात कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येईल. यात पंचायत खात्यातर्फे ३ कोटी ५० लाख व सांकवाळ पंचायतीतर्फे ३ कोटी ५० लाख रुपये खर्च करून नवीन अत्याधुनिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून पंचायत घर उभारण्यात येईल अशी माहिती पंचायत मंत्री गुदिन्हो यांनी दिली. राज्य सरकारने प्रत्येकाच्या घरात आपल्या योजना पुरवलेल्या आहे. गोव्यात भाजप सरकारच्या पंचायत खात्याअंतर्गत एकूण २६ नवीन पंचायत घरे उभारण्यात आली असल्याची माहिती पंचायत मंत्री गुदिन्हो यांंनी दिली.

Panchayat Minister Mauvin Godinho and other dignitaries inaugurating Sancoale's temporary panchayat (Goa)
Goa: पैकुळ सत्तरीत तातडीने पुल बांधावा; अन्यथा आंदोलन

कुठ्ठाळीतील विविध पंचायतीत चांगल्या साधन सुविधा पुरवणे माझे प्राथमिक कार्य असून यात मात्र स्थानिक लोकप्रतिनिधी यात अडथळा आणत असल्याची टीका यावेळी पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी केली. साकवाळ पंचायत क्षेत्रात येथील लोकप्रतिनिधी विकास साधण्यास पूर्णपणे अपयशी ठरल्यामुळे पंच सदस्यांनी माझ्याजवळ संपर्क साधून विकास कामे करण्यासाठी करण्याची विनंती केली. पंचायत मंत्री या नात्याने ते पूर्ण करणे हेच माझे ध्येय होते. यात सुद्धा स्थानिक लोकप्रतिनिधी सरकार दरबारी जाऊन माझ्या विरोधात तक्रारी करुन विकास कामांना अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. राज्य सरकारात मी पंचायत मंत्री असल्याने सर्व पंचायतींना अर्थसहाय्य व चांगल्या सुविधा देण्याचे माझे प्राथमिक काम असल्याचे मंत्री पुढे गुदिन्हो यांनी सांगितले. नवीन साखर पंचायतीचे काम घडविण्यास सुद्धा स्थानिक लोकप्रतिनिधी बरोबर येथील काही पदाधिकारी होते विकासकामांना अडथळा आणून एकाप्रकारे स्थानिक लोकप्रतिनिधी आपली प्रतिमा खालावत असल्याची टीका मंत्री गुदिन्हो यांनी केली. मी कुठ्ठाळीचा आमदार असताना कलाभवन, कुठ्ठाळी मार्केट प्रकल्प, झुआरी नगर येथील मार्केट प्रकल्पाची सुरुवात केली होती. पण गेल्या दहा वर्षात यातील एकही प्रकल्प मार्गी लागला नाही. जर दुसरा एखादा कामे करण्यास पुढे येत असेल तर त्याला विरोध करणे हे चुकीचे आहे. कुठ्ठाळी सोडून दाबोळीत गेल्याने मला खूपच दुःख झाले होते. मी पुन्हा कुठ्ठाळीत येणार नसून मी दाबोळीतून येणारी विधानसभा निवडणुक लढवणार असल्याची माहिती पंचायत मंत्री गुदिन्हो यांनी शेवटी दिली.

Panchayat Minister Mauvin Godinho and other dignitaries inaugurating Sancoale's temporary panchayat (Goa)
Goa Police: गृहरक्षक रवळू गांवस यांचा हणजुण पोलीसातर्फे जाहीर सत्कार

सांकवाळ नवीन पंचायत घर उभारण्यास लवकरच सुरुवात होणार असून यात सरकारचे चांगले सहकार्य लाभत आहे. पंचायतमंत्री गुदिन्हो यांच्या पुढाकाराने सांकवाळ नवीन पंचायत घर बांधकामाच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. पण स्थानिक लोकप्रतिनिधी स्वतः विकास करीत नाही व दुसऱ्याला सुद्धा विकासाची कामे करण्यास अडथळा निर्माण करीत आहे. अशा लोकप्रतिनिधींकडून मतदार संघाचा विकास होणे मुश्कील असल्याचे प्रतिपादन सांकवाळचे सरपंच रमाकांत बोरकर यांनी केले. यावेळी पंचायत मंत्री गुदिन्हो यांच्या हस्ते नवीन स्थलांतरित तात्पुरते पंचायतीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी दत्ता कारे सल्लागार अभियंता याने नवीन साकवाळ पंचायत घराचा आराखडा पंचायतमंत्री समोर व पंचायत सदस्यांना दाखविला. यावेळी पंचायत मंत्री गुदिन्हो यांच्या हस्ते साकवाळ भागातील जनतेला नवीन शववाहिकेचे लोकार्पण केले. कार्यक्रमात लीगोर मोंतेरो, अनिता थोरात यांचीही भाषणे झाली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पंच नंदिनी देसाई यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com