Beef Traders Strike: 'आम्हाला संरक्षण द्या!' मांसविक्रेते संपावर; संरक्षणासाठी घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

Gorakshak-Beef Traders Clash Fatorda: मांसविक्रेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सर्व मांसविक्रेत्यांना सरकारकडून संरक्षण देण्याची मागणी केली आहे
Goa Beef Traders Strike
Goa Beef Traders StrikeDainik Gomantak
Published on
Updated on

फातोर्डा: एसजीपीडीए मार्केटात ३ बीफ विक्रेत्यांना मारहाण करण्याची घटना शनिवारी (२१ डिसेंबर) सकाळी घडली. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केल्याचा दावा विक्रेत्यांतर्फे केला गेला आणि मारहाणप्रकरणी नंतर विक्रेत्यांनी फातोर्डा पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली. आता प्रकरणाने वेगळीच कलाटणी घेतली असून गोव्यातील गोमांस व्यापारी आपली दुकाने बंद ठेवत इराणा आचार्य, साईश मालवणकर आणि पवन जाधव यांच्या अटकेची मागणी करत आहेत, तसेच मांसविक्रेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सर्व मांसविक्रेत्यांना सरकारकडून संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

मांस विक्रेते आणि गोरक्षकांनी एकमेकांविरुद्ध तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी अफजल बेपारी व युनूस बेपारी या दोघांना अटक केली आहे तरतिसरा संशयित माजीद बेपारी हा होता.

Goa Beef Traders Strike
Goa Crime: गोरक्षक-मांसविक्रेत्यांमध्ये धुमश्चक्री!! परस्परविरोधी तक्रारी; दोघांना अटक

तर दुसऱ्या बाजूला अफजल बेपारी यांच्याकडून किरण आचार्य, साईश मालवणकर व पवन जाधव यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. ते दोघेही बजरंग दलाशी निगडित आहेत, असा दावा विरोधी गटाकडून करण्यात आलाय.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोवा राज्य नोंदणीकृत एक वाहन मांस घेऊन आले होते, त्यावेळी काही युवकांनी ते वाहन अडवून मांस कुठून आणले याबाबत विचारणा केली. नंतर मारहाणीची घटना घडली. दरम्यान, फातोर्डा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नेथन आल्मेदा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पुढील तपास सुरू असल्याची माहिती दिली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com