पणजी: गोव्यात 40 जागांसाठी पुढील आठवड्यात निवडणूक (Goa Assembly Election 2022) होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांची प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. गोवा निवडणुकीच्या रिंगणात एकूण 301 उमेदवार उतरले आहेत. पण गंमत म्हणजे यातील 187 उमेदवार कोट्यधीश आहेत. म्हणजे 62 टक्के उमेदवार करोडपती आहेत. गोवा इलेक्शन वॉच आणि असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) यांच्या संयुक्त सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहेत. नोंदणी केलेल्या उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांची छाननी केल्यानंतर, दोन्ही संस्थेच्या तज्ञांच्या पथकाने असा निष्कर्ष काढला आहे की एकूण 301 उमेदवारांपैकी 93 उमेदवारांकडे 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. (Election of rich people in Goa Out of 301 candidates number of Millionaire is 187)
त्याच वेळी, 48 उमेदवार असे आहेत ज्यांची एकूण मालमत्ता 2 ते 5 कोटी आहे. तर 65 उमेदवार 50 लाख ते दोन कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. 10 लाख ते 50 लाखांपर्यंत संपत्ती असलेले 60 उमेदवार आहेत. गोव्यात केवळ 35 उमेदवार आहेत ज्यांची संपत्ती 10 लाखांपेक्षा कमी आहे.
सर्वात जास्त मालमत्तेचा मालक
निवडणुकीपूर्वी प्रतिज्ञापत्रात सर्वाधिक संपत्ती दाखविणारे श्रीमंत उमेदवार डॉ.चंद्रकांत शेट्ये आहेत. त्यांच्याकडे 8 कोटींहून अधिक संपत्ती आहे. यानंतर नीलेश काब्राल हे 3 कोटींहून अधिक किमतीच्या जंगम मालमत्तेचे मालक आहेत.
सर्वात कमी मालमत्ता मालक
आपल्या प्रतिज्ञापत्रात ज्या अपक्ष उमेदवाराने सर्वात कमी संपत्ती जाहीर केली आहे ते जगन्नाथ गोवेकर आहेत, ज्यांनी शपथपत्रात केवळ 25 हजार रुपये दाखवले आहेत. तर देविदास गोवेकर यांच्याकडे 25500 रुपयांची संपत्ती आहे.
कोणत्या पक्षाचे किती उमेदवार करोडपती आहेत
राजकीय पक्षांच्या म्हणण्यानुसार भाजपचे 40 पैकी 32 उमेदवार, काँग्रेसचे 37 पैकी 32 उमेदवार एक कोटीहून अधिक संपत्तीचे मालक आहेत. त्याचवेळी आम आदमी पार्टीचे 39 पैकी 24 उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 13 पैकी 8 उमेदवार कोट्यधीश आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.