सहा महिन्यांत कायदेशीर मार्गाने खाणी सुरू करण्याचे भाजप कडून आश्‍वासन

नितीन गडकरी : गोव्यासाठी सर्वसमावेशक संकल्प पत्राचे प्रकाशन
Goa Mining
Goa MiningDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा राज्यातील महिलांना दरवर्षी 3 गॅस सिलिंडर मोफत, तसेच सहा महिन्यांत कायदेशीर मार्गाने खाणी सुरू करणार, अशी प्रमुख आश्‍वासने भाजपने आपल्या संकल्प पत्रात (जाहीरनामा) दिली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भाजपच्या 22 कलमी संकल्पपत्राचे प्रकाशन करण्यात आले. लोकांचे कल्याण व प्रगती हेच भाजपचे उद्दिष्ट आहे. यामुळेच बाल, महिला, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांचा विचार करून सर्वसमावेशक असा जाहीरनामा (Goa BJP Manifesto) बनवला आहे, असे गडकरी म्हणाले. (BJP promises to start Goa Mining legally in six months)

Goa Mining
प्रियंका गांधीनी कोरोनाचे नियम मोडले: तृणमूल

यावेळी केंद्रीय मंत्री तथा उत्तर गोवाचे खासदार श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Goa CM Pramod Sawant), गोवा भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस, उप प्रभारी दर्शना जर्दोश, खासदार विनय तेंडुलकर, जयकिशन रेड्डी, जाहीरनामा समितीचे उपाध्यक्ष सुभाष शिरोडकर आदी मान्यवर उपस्थित होते. गडकरी म्हणाले, स्व. मनोहर पर्रीकर यांचे सुवर्ण गोव्याचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम मुख्यमंत्री प्रमोद सावंत करत आहेत. गोमंतकीयांसमोर सादर केलेल्या २२ कलमी जाहीरनाम्यात सर्व घटकांचा विचार असून गोवा (Goa) प्रदूषणमुक्त करण्यासाठी त्यांनी सार्वजनिक इलेक्ट्रिक वाहनांसाठी अनुदानाची केलेली घोषणा कौतुकास्पद आहे. भाजपने (Goa BJP) खोटी किंवा न झेपणारी आश्वासने दिलेली नाहीत. तर लोकांच्या गरजा, त्यांच्या मागण्या आणि त्यांच्या अपेक्षा यांचा विचार करून हा जाहीरनामा सर्वांसमोर मांडला आहे, असे गडकरी म्हणाले.

गोवा-कर्नाटक महामार्गाला 15 हजार कोटी

गोव्यात पायाभूत सुविधांसाठी केंद्राने सुमारे 40 हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. गोवा-मुंबई महामार्गासाठी 15 हजार कोटी रुपये तर इतर पायाभूत सुविधांसाठी 25 हजार कोटी रुपये राज्याला दिलेत. आता गोवा-कर्नाटक महामार्गासाठी मी 15 हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याचे गडकरी यांनी सांगितले.

Goa Mining
दाबोळीतील वाहतूक कोंडीची समस्या दूर करू: माविन गुदिन्हो

संकल्प पत्रातील ठळक मुद्दे

पात्र महिलांसाठी 2 टक्के व पुरुषांसाठी 4 टक्के व्याजदराने गृहकर्ज देणार. तीन वर्षांसाठी पेट्रोल व डिझेलवरील राज्यशुल्क वाढवणार नाही.दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेंतर्गत वृद्धापकाळ निवृत्ती वेतन दरमहा 3 हजार रुपयांपर्यंत वाढवू. मनोहर पर्रीकर कल्याण निधीची स्थापून पंचायतीसाठी 3 कोटीपर्यंतचा आणि प्रत्येक पालिकेसाठी 5 कोटीपर्यंतचा समान विकासनिधी पुरवू असा संकल्प पत्रात उल्लेख आहे.

काँग्रेसने 80 रुपयांच्यावर पेट्रोल-डिझेल दर जाणार नाहीत, असे आश्वासन दिलेय. मात्र, आता इलेक्ट्रिक तसेच इथेनॉलवर चालणारी वाहने येऊ घातली आहेत. बसगाड्याही पर्यायी इंधनावर धावतील. इथेनॉल 62 रुपयांना उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पेट्रोलची गरजच भासणार नाही.

- नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री

2017 च्या निवडणुकीतील जाहीरनाम्यातील 80 टक्के कामे आम्ही पूर्ण केली. अनेक राजकीय पक्ष गोव्यात खाते उघडण्यासाठी खोटी आश्‍वासने देत आहेत.काँग्रेसने 2007 सालचे किती आश्‍वासने पाळली हे दिगंबर कामतांनी जाहीर करावे. काँग्रेस सरकारच्या काळात किती घोटाळे झाले, याची यादी आमच्याकडे आहे.

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com