पणजी: पंडित नेहरूंना आपल्या आंतरराष्ट्रीय छबीची इतकी चिंता होती की त्यांनी ती जपण्यासाठी गोव्यात सैन्य पाठविले नाही. नेहरूंच्या या वागण्याने स्वातंत्र्यानंतर 15 वर्षे गोवा पारतंत्र्यातच राहिला, असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल राज्यसभेत केला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर उत्तर देताना ते बोलत होते. मोदींची (PM Narendra Modi) टीका सुरू होताच काँग्रेसने सभात्याग केला.(PM Narendra Modi's statment on Pandit jwaharlal nehru)
तसेच, सोमवारी लोकसभेत काँग्रेसवर (Goa Congress) टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक वेळा माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे नाव घेतले. लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान मोदी हे उत्तर देत होते. ते म्हणाले,"मी नेहरूजींचे नाव पुरेसे घेत नाही, अशी तुम्ही तक्रार करत राहता. आज मी फक्त नेहरूजींबद्दल बोलणार आहे"
गोव्यावर अत्याचार!
तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंच्या (Pandit Jawaharlal Nehru) भूमिकेला नरेंद्र मोदींनी गोव्यावर केलेले अत्याचार असे संबोधले. ते म्हणाले, सत्याग्रही जेव्हा गोळ्या झेलत होते तेव्हा, नेहरूंनी 15 ऑगस्ट 1955 रोजी लाल किल्ल्यावरून गोव्यात सैन्य पाठवणार नाही असे सांगताना जे लोक तेथे जात आहेत त्यांना ते लखलाभ होवो, अशी अत्यंत अहंकारी भाषा वापरली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.