Goa Rain Update: घरांमध्ये पावसाचे पाणी, साहित्याची नासाडी, पडझडीच्या घटना

Goa News: मुसळधार पावसामुळे म्हापसा शहरासह बार्देश तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे
Goa News: मुसळधार पावसामुळे म्हापसा शहरासह बार्देश तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे
Goa FloodDainik Gomantak

रविवारपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे म्हापसा शहरासह बार्देश तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदी किनाऱ्यावरील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने साहित्यांची नासाडी झाली तर काही ठिकाणी पडझडीच्या घटना समोर आल्या. परिणामी अग्निशमन दलाची मागील दोन दिवस धावपळ सुरू आहे.

कुचेली येथे सडये दरम्यानच्या नदीमध्ये झाडे उगवल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे गुरूदास मिरजकर व रमेश वायंगणकर यांच्या घरात पाणी शिरून नासाडी झाली.

नगराध्यक्षा डॉ. नूतन बिचोलकर, नगरसेवक आनंद भाईडकर, सडयेच्या सरपंच दिपा पेडणेकर यांनी जलस्रोत खात्याचे साहाय्यक अभियंता सतीश पास्ते व सहकारी अधिकाऱ्यांसमवेत घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. प्रवाहला अडथळा तथा पुरसदृश्य स्थितीला कारणीभूत ठरणारी झाडे कापण्यासाठी वन खात्याकडे पाठपुरावा करावा, अशी सूचना नगराध्यक्षा डॉ. बिचोलकर तसेच सडये सरपंच पेडणेकर यांनी जलस्त्रोत अधिकाऱ्यांना दिली.

म्हापसा नदी किनारी सुहास च्यारी, अशोक मावळणकर, वामन परब व कृष्णा भिवशेट यांच्या घरात पाणी शिरले अन् हानी झाली. तसेच शेट्येवाडा येथील शरद पिरणकर यांच्या घरात पाणी घुसून त्यांचेही आर्थिक नुकसान झाले.

Goa News: मुसळधार पावसामुळे म्हापसा शहरासह बार्देश तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे
Goa Monsoon: मागील तुलनेत १० इंचाहून अधिक पावसाची नोंद

शांतीनगर-खोर्लीत घरांचे नुकसान

शांतीनगर खोर्ली टेकडीचा भलामोठा दगड कोसळून मनोहर गडेकर यांच्या घराचे तसेच संरक्षक भिंतीचे नुकसान झाले. तसेच, खैराट कामुर्ली येथील नेसी फर्नांडिस व आल्बिनो फर्नांडिस यांच्या घरावर झाड कोसळून लाखभराची हानी झाली. याशिवाय कामुर्ली येथे अभय पेडणेकर यांच्या घरावर झाड कोसळून त्यांचे ५० हजारांचे नुकसान झाले. साळगाव येथे एका घरावर माड कोसळला. खोर्ली, गिरी, आसगाव, धुळेर, शिवोली, पर्वरी या ठिकाणी रस्ते व वीज वाहिन्यांवर झाडे कोसळली.

Goa News: मुसळधार पावसामुळे म्हापसा शहरासह बार्देश तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे
Goa Rain: पावसाचा हाहाकार! जनजीवन विस्कळीत

मिनी मार्केटचे नुकसान

करासवाडा-म्हापसा येथे पावसाचे पाणी सिद्धार्थ गुरुदास हरमलकर यांच्या मिनी मार्केटमध्ये शिरल्याने साहित्य खराब झाले. या मार्गावरील पाण्याचा निचरा झाला नाही. गटारे भरल्याने ते पाणी दुकानात शिरले. मार्केटमधील तांदूळ, पीठ इतर कडधान्य व इतर वस्तू भिजून सुमारे हजारो रुपयांचे नुकसान झाले.

कार वाहून गेली!

गिरी येथील पुराच्या पाण्यात एक कार वाहून गेली. रहिवाशांनी कारमधील लोकांना सुखरूप वाचवले व शेतातील झाडाला अडकलेली कार ओढून बाहेर काढली. पावसाच्या पाण्यामुळे गिरी व बस्तोडा व कुचेली परिसराला पुराचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com