राज्यात ४ जून रोजी मॉन्सून दाखल झाल्यानंतर जून महिन्यात एकूण ९३८.९ मिमी म्हणजेच ३६.९६ इंच पावसाची नोंद करण्यात आली. राज्यात मागील वर्षाच्या तुलनेत १० इंचाहून अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे.
राज्यात ७ जून रोजी सर्वाधिक ९५.१ मिमी (३.७४ इंच) पावसाची नोंद करण्यात आली. जूनमधील काही दिवस अतिशय तुरळक पावसाची नोंद झाली. जूनच्या शेवटच्या आठवड्यात ११ इंच पाऊस झाल्याने राज्यातील पावसाची कमतरता भरून काढली.
राज्यात मागील २४ तासांत सरासरी २८.६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. राज्यात मागील २४ तासांत वाळपईत सर्वाधिक पाऊस ७९.३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.
साखळी ५२.४ मिमी, जुने गोवे ३८.६ मिमी, फोंडा ३०.८ मिमी, पणजी २८.८ मिमी, मुरगाव २८.४ मिमी, सांगे २७.२ मिमी, काणकोण २७ मिमी, पेडणे २२.४ मिमी, म्हापसा २१ मिमी, केपे २०.२ मिमी, दाबोळी ८.२ मिमी, मडगाव ५.८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. आतापर्यंत राज्यात एकूण ९६७.५ मिमी पावसाची नोंद करण्यात आलीआहे.
राज्यात मागील आठवड्यात जोरदार पडलेल्या पावसानंतर आता पावसाचा जोर काहीसा मंदावला आहे. राज्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तविली असून राज्यात पुढील चार दिवस यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.