Goa Crime News : डॉ. वेरेकरांचा काटा काढण्‍यासाठी विषारी सापाचा वापर!

2005चे प्रकरण : प्रयत्‍न अयशस्‍वी ठरल्‍यानंतर जावई रायनने गाडीतच गळा आवळून केला सासऱ्याचा खून
Goa Murder News
Goa Murder NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Crime News : मांगूरहिल-वास्को येथील प्रसिद्ध डॉ. श्रीकांत वेरेकर यांचे 2005 साली अपहरण करून नंतर खून करण्‍याचे प्रकरण राज्‍यात खूपच गाजले होते. विशेष म्‍हणजे त्यांचाच जावई रायन फर्नांडिस यानेच त्‍यांना मारल्‍याचा आरोप झाला होता.

वेरेकर यांना मारण्यासाठी एका विषारी सापाचाही वापर करण्यात आला होता. मात्र त्याचे दातच काढून आणल्याने वेरेकर यांना चावा घेऊनही त्यांना मृत्यू येत नसल्याने आरोपी रायन याने अन्‍य साथीदारांच्‍या मदतीने चालत्या गाडीतच त्‍यांचा गळा आवळून खून केला होता.

या प्रकरणामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांपुढेही या प्रकरणाचा छडा लावण्याचे मोठे आव्हान होते. सरकारच्या कायदा व सुव्यवस्थेवर विरोधकांनी बोट ठेवले होते.

वास्कोचे तत्‍कालीन पोलिस निरीक्षक महेश गावकर यांनी या खुनाचा छडा लावत रायन फर्नांडिस याच्यासह पाचजणांच्या मुसक्या आवळल्या होत्या.

Goa Murder News
Goa Crime News : डॉ. श्रीकांत वेरेकर हत्‍या प्रकरण; लव्ह ट्रॅप, सूड, खून, फाशी, जन्‍मठेप आणि सुटकेची कहाणी

डॉ. वेरेकरांच्‍या मुलीला रायनने ओढले जाळ्‍यात

डॉ. श्रीकांत वेरेकर हे वास्कोतील प्रसिद्ध डॉक्टर. त्यांची कन्या बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात प्रथम वर्ष एमबीबीएस अभ्यासक्रम शिकत होती. रायन फर्नांडिस हा पांढरपेशा गुन्हेगार होता.

तो गोमेकॉ इस्पितळाच्या आवारात अलिशान वाहने घेऊन येऊन वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या मुलींवर छाप टाकायचा. त्यामध्ये वेरेकर यांच्‍या मुलीशी त्याने ओळख केली. त्याचे रुपांतर प्रेमात झाले.

त्यांचे हे प्रेमप्रकरण वेरेकर कुटुंबाला समजले व त्यांनी तिला रायनपासून दूर राहण्यासाठी अनेकदा समजावले. मात्र प्रेमात आंधळे झालेल्या त्यांच्या मुलीने त्यांचे ऐकले नाही व रायनच्या प्रेमात भरकटत गेली.

डॉ. वेरेकर मॉर्निंग वॉकला गेले असता साधली संधी

डॉ. वेरेकर हे नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला निघाले. ते वाहनाकडून पुढे गेल्यावर हे वाहन त्यांच्या मागोमाग नेले. संधी साधून वाहनाचे दार उघडण्यात आले व वेरेकर यांना गाडीमध्ये ढकलून त्यांना आरडाओरड करता येऊ नये म्हणून तोंड दाबण्यात आले.

चालत्या गाडीतून काही अंतरावर गेल्यावर गदगकर याने आणलेला साप पाईपमधून वेरेकर यांच्या शरीराला दंश करण्यासाठी सोडला. पण सापाने दंश केला तरी वेरेकर बेशुद्ध पडत नव्हते. असा प्रकार अनेकदा केला, पण यश आले नाही.

त्यांना सोडल्यास पोलिसांकडून पकडले जाऊ या भीतीने वाहनातून वेर्णा येथील निर्जनस्थळी नेऊन डॉ. वेरेकर यांचा गळा आवळून खून करण्यात आला. गदकर यानेही आणलेला साप सोडून दिला. त्यांचा मृतदेह तेथेच अडगळीत टाकून हते पसार झाले.

लग्नानंतर केला संपत्ती, पैशांसाठी छळ

त्यानंतर त्या दोघांनी पळून जाऊन रजिस्टर विवाह केला. काही दिवस त्याच्यासोबत राहिल्यानंतर रायन याने तिच्या वडिलांकडून पैसे आणण्याचा तगादा लावला व तिच्यावर अत्याचार करण्यास सुरवात केली. त्‍यानंतर ती कंटाळून वडिलांच्या घरी पुन्‍हा परतली होती.

अनेकदा रायन तिला आणण्यासाठी वास्को येथील तिच्या घरी गेला, मात्र ती व तिचे वडील डॉ. वेरेकर यांनी त्याला अपमानित करून पाठविले. त्यामुळे रायन याच्या मनात सुडाची भावना निर्माण झाली. त्याने अनेकदा त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

मात्र पूर्वनियोजनात त्रुटी राहिल्‍याने त्‍यात तो अयशस्वी ठरला. वेरेकर हे नेहमी सकाळच्या प्रहरी मॉर्निंग वॉकला जातात याची कल्पना रायनला होती. त्यामुळे त्याने त्यांचा खून करण्याचा कट रचला.

Goa Murder News
Sushmita Sen : या आजाराने 2014 पासून त्रस्त आहे सुष्मिता सेन आणि त्यातच आता हार्ट अ‍ॅटॅक...

रायन फर्नांडिसला फाशीची, तिघांना जन्मठेपेची शिक्षा

प्रथमेश याची जबानी नोंद केल्यानंतर त्याला माफीचा साक्षीदार करण्यात आले. त्याच्या जबानीच्या तसेच पुराव्यांच्या आधारावर सत्र न्यायालयाने आरोपी रायन फर्नांडिस याला फाशीची तर इतर तिघांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

तपास अधिकारी महेश गावकर यांनी तपासात कोणत्याच त्रुटी न ठेवल्याने उच्च न्यायालयाने त्या तपासकामाची प्रशंसाही केली. सर्वोच्च न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तबही केले होते.

प्रथमेश गदगकर बनला माफीचा साक्षीदार

चौकशीवेळी सापाचा वापर करण्यात आल्याचे उघडकीस आले व तो प्रथमेश गदगकर याने आणला होता हे स्पष्ट झाले. पोलिसांनी प्रथमेश याची जबानी नोंद करताना त्याने वाहनामध्ये सापाचा वापर करताना घडलेला प्रसंग सांगितला.

तसेच विषारी सापाने दंश केल्यास कोणाचाही मृत्यू होऊ शकतो व त्यामुळे त्याचे दात काढून आणल्‍याचे पोलिसांना सांगितले. त्याने सर्व प्रकार सांगण्याची हमी न्यायालयाला देत माफीच्‍या साक्षीदारासाठी अर्ज केला.

सापाचे दातच काढल्‍याने प्रयत्‍न फसला

डॉ. वेरेकर यांना ठार मारण्यासाठी रायनने आणखी चौघांना मदतीसाठी घेतले. विषारी सापाने चावा देऊन ठार मारण्याचा त्‍याने प्लॅन आखला व त्यानुसार त्याने प्रथमेश गदगकर याला एक विषारी साप घेऊन येण्यास सांगितले.

हा साप चावल्यास आपलाच मृत्यू होईल या भीतीने प्रथमेशने त्या सापाचे दात एका गारुड्याकडून काढून घेतले होते. 17 जानेवारी 2005 या दिवशी डॉ. वेरेकर यांचा गेम करण्याचे ठरले. त्यानुसार रायन व इतर चौघेजण मांगूरहिल येथील रस्त्याच्या बाजूला मारुती व्हॅनमध्ये बसलेले होते.

Goa Murder News
Sandeep Deshpande: मनसे नेत्यावर क्रिकेट स्टम्प्सने हल्ला, मॉर्निंग वॉकवेळी मुंबईत घडली घटना

वेर्णा येथे मृतदेह

नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला गेलेले डॉ. श्रीकांत वेरेकर हे 11 वाजेपर्यंत घरी परतले नव्हते. तत्कालिन पोलिस निरीक्षक महेश गावकर यांनी कुटुंबीयांकडून सविस्तर माहिती घेतली. डॉ. वेरेकर यांचे अपहरण झाल्याची बातमी वाऱ्यासारखी राज्यात पसरली.

सरकार व पोलिस यंत्रणाही कामाला लागली. अनेक पोलिस पथके तैनात करून वास्को, वेर्णा तसेच इतर भागात पोलिसांनी शोधाशोध सुरू केली. वेर्णा येथे एक मृतदेह असल्याची माहिती दुपारनंतर पोलिसांना मिळाली. तो मृतदेह वेरेकर यांचाच असल्याची ओळख पटली.

पोलिसांकडून रात्रभर चौकशी

तपास अधिकारी महेश गावकर यांनी रायन फर्नांडिस याला ताब्यात घेऊन संपूर्ण रात्रभर त्‍याची चौकशी केली. डॉ. वेरेकर यांचे अपहरण झाले तेव्हापासूनचा रायनच्‍या ठावठिकाणा कोठे होता याची माहिती मिळविण्यात आली.

रात्रभर पोलिसांच्या चौकशीच्या ससेमिऱ्याला कंटाळून अखेर त्याने कबुली दिली. तसेच त्यासाठी त्‍याला मदत केलेल्‍यांची नावेही उघड केली. या चौकशीतून फ्रान्‍सिस्‍को ऊर्फ फ्रान्‍सिस ग्रेगोरिया पॉल डिसा, राजेंद्र ऊर्फ राजन सिंग, सचिन परब व प्रथमेश गदगकर यांना गजाआड करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com