Sushmita Sen : या आजाराने 2014 पासून त्रस्त आहे सुष्मिता सेन आणि त्यातच आता हार्ट अ‍ॅटॅक...

अभिनेत्री सुष्मिता सेन 2014 पासुन या आजाराने त्रस्त आहे
Sushmita Sen
Sushmita Sendainik Gomantak

Sushmita Sen Suffering from Addison's Disease: अभिनेत्री सुष्मिता सेन एका विचित्र आजाराचा सामना करत आहे आणि आता त्यातच तिला हार्ट अ‍ॅटॅक आल्याची माहिती तिने स्वत: दिली आहे.

सुष्मिता सेनने गुरुवारी तिच्या चाहत्यांना सांगितले की, तिला काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता आणि ती सध्या त्यातून बरी होत आहे. यापूर्वी, तिने 2014 मध्ये एडिसन आजाराचे निदान झाल्याबद्दल खुलासा केला होता.

सुष्मिताने 2020 मध्ये या आजाराचा सामना करतानाचा तिचा अनुभव शेअर केला होता. तिने सोशल मीडियावर लिहिले, “मला सप्टेंबर 2014 मध्ये एडिसन रोग नावाच्या ऑटोइम्यून स्थितीचे निदान झाल्यानंतर , मला असे वाटू लागले की, माझ्यात लढण्याची ताकद उरली नाही...

प्रचंड निराशा आणि आक्रमकतेने भरलेले आणि थकलेले शरीर. माझ्या डोळ्यांखालील काळी वर्तुळे 4 वर्षे मी किती काळोख सहन केला हेच सांगतील, स्टिरॉइड्सचा पर्याय कोर्टिसोल घेणे आणि त्याच्या असंख्य दुष्परिणामांसह जगणे हे त्याचे परिणाम आहेत. दीर्घ आजाराने जगण्यामुळे थकवण्यासारखं थकवणारं दुसरं काहीही नाही."

पुढे माहिती देताना ती म्हणाली की, स्टिरॉइडवर अवलंबून राहण्याचा तुमच्यावर नकारात्मक प्रभाव पडतो, परंतु ती चांगली ट्रिटमेंट करण्याच्या स्थितीत होती आणि जे करणे आवश्यक आहे ते करण्यासाठी ती देवाचं आभारही मानते .

 या आजाराच्या काळात तिला प्रश्न पडला की ती हे जास्त काळ टिकवून ठेवू शकेल का, याचा तिच्या मुलांवर आणि तिच्या जबाबदाऱ्यांवर कसा परिणाम होईल. त्यातून तिला अनेक प्रश्न पडले आणि आरोग्य ही संपत्ती कशी असते याची जाणीवही करून दिली.

Sushmita Sen
Allu Arjun Upcoming Movie: अल्लू अर्जुन नव्या चित्रपटात पुन्हा दिसणार या अभिनेत्रीसोबत...

सुष्मिताने तिच्या पोस्टमध्ये असेही म्हटले आहे की ननचाकू, पारंपारिक आशियाई मार्शल आर्ट फॉर्मसह ध्यानधारणा या गोष्टी तिला या आजाराचा सामना करण्यास मदत करत आहेत. या आजारातुन ती लवकर बरी व्हावी अशीच प्रार्थना आता तिचे करत आहेत

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com