MNS Leader Sandeep Deshpande Attacked: मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कमध्ये मॉर्निंग वॉकवेळी क्रिकेटच्या स्टम्प्सने हल्ला करण्यात आला.
राजकीय वैमन्यस्यातून हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. देशपांडे यांच्यावर हिंदूजा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. संदीप देशपांडे मनसेचे सरचिटणीस आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) दादर येथील शिवाजी पार्कमध्ये मॉर्निंग वॉक करत असताना चार अज्ञात इसमांनी त्यांच्यावर हल्ला केला. क्रिकेट स्टम्प्सने हा हल्ला करण्यात आला असून, हल्लेखोरांनी आपला चेहरा कपड्याने झाकला होता.
हल्ला केल्यानंतर आरोपींनी घटनास्थाळावरून पळ काढला. संदीप देशपांडे सध्या सुखरुप आहेत. त्यांना थोडा मार लागला आहे. त्यांनी उपचारासाठी हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शिवाजी पार्क पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पंचनामा करण्यात आला आहे.
दरम्यान, मनसेकडून या हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे. पोलिसांनी दोषींना ताबडतोब अटक करावी आणि शासन करावे… अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.
मनते अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackray) यांच्यासह त्यांचे पुत्र आणि मनसेचे युवा नेते अमित ठाकरे (Amit Thackray) तसेच, बाळा नांदगावकर यांनी हिंदुजा रूग्णालयात जात संदीप देशपांडे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
कांग्रेस नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी देखील संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. पोलिसांनी हल्लेखोरांना पकडून तात्काळ अटक करावी असे ट्विट कांग्रेस नेते सचिन सावंत यांनी केले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.