Women Reservation Bill: भाजपचा 'महिला कार्ड' खेळण्याचा डाव? डॉ. अंजली निंबाळकरांचा हल्लाबोल! "आरक्षणाची एवढीच ओढ असेल, तर सीमांकनाची वाट का पाहताय?"

dr anjali nimbalkar slams bjp: भाजपला महिलांविषयी एवढी आत्मीयता आहे, तर त्यांनी लोकसभेच्या २०२३ मध्ये मंजूर झालेले महिला आरक्षण विधेयक लागू करावे आणि ५४३ जागांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण द्यावे.
dr anjali nimbalkar slams bjp
dr anjali nimbalkarDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: भाजपला महिलांविषयी एवढी आत्मीयता आहे, तर त्यांनी लोकसभेच्या २०२३ मध्ये मंजूर झालेले महिला आरक्षण विधेयक लागू करावे आणि ५४३ जागांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण द्यावे. परंतु भाजपला सीमांकनाच्या नावावर देशाच्या सीमा मोडायच्या आहेत आणि आपल्याला हवे, तसे सीमांकन करून घ्यावयाचे आणि २०२९ चे लोकसभा निवडणुकाला सामोरे जायचा, भाजपचा डाव असल्याचा आरोप डॉ. अंजली निंबाळकर यांनी केला.

काँग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. याप्रसंगी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष सुनील कवठणकर, वरिष्ठ उपाध्यक्ष एम. के. शेख यांची उपस्थिती होती.

dr anjali nimbalkar slams bjp
CM Pramod Sawant: आंबेडकरांना काँग्रेसकडूनच खोडा, दोनवेळा लोकसभेत जाण्यापासून रोखलं; मुख्यमंत्री सावंतांचा घणाघात

ॲड. निंबाळकर म्हणाल्या, २०२३ मध्ये महिला आरक्षण विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यात आले आहे, ही बाब सर्वश्रुत आहे. विरोधी पक्षांनी विद्यमान ५४३ जागांमध्येच या विधेयकाची तत्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. परंतु भाजप सरकारला सध्याच्या जागांमध्ये आरक्षण द्यायचे नाही. जातीय जनगणना करून आरक्षण देण्यात काहीच अडचणी नाहीत, पण ती जातीय जनगणना सरकार करीत नाही. मात्र, जर सरकारला महिलांविषयी एवढी आत्मीयता असेल, तर सरकारने त्वरित अधिवेशन बोलावून पुन्हा पूर्वीचे आरक्षण विधेयक मांडावे, सर्व विरोधी पक्ष त्याला पाठिंबा देतील.भाजप देशभरात लोकसभेच्या जागांसाठी सीमांकन करून या जागा साडेआठशेच्या वर नेऊ इच्छित आहे. यामागे भाजपचा डाव आहे.

dr anjali nimbalkar slams bjp
Goa Congress: संघटनासाठी गोवा काँग्रेसने ठोकला शड्डू! निवडणार 4 जिल्हाध्यक्ष, वरिष्ठ निरीक्षकांचा 7 दिवस राहणार मुक्काम

कोणालाच मंत्रिपद नाही?

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपल्या सरकारमध्ये असलेल्या तीन महिला आमदारांपैकी एकाही महिलेला मंत्रिपद का दिले गेले नाही? तसेच, राष्ट्रपती किंवा पंतप्रधान यांसारख्या पदांसह, राष्ट्रीय स्तरावर भाजपने एकूण किती महिला उमेदवारांना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे? असाही प्रश्न काँग्रेस पक्षाच्यावतीने उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांनी उपस्थित केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com