

पणजी: काँग्रेसकडून गोव्यात संघटन स्तरावर चार जिल्हाध्यक्ष निवडले जाणार आहेत. त्यासाठी उत्तर गोव्यात दोन आणि दक्षिण गोव्यात दोन जिल्हाध्यक्ष राहणार आहेत. या निवड प्रक्रियेसाठी येत्या १७ मार्चपासून १ मेपर्यंत पक्षाचे वरिष्ठ नेते निरीक्षक म्हणून गोव्यात येणार आहेत.
प्रत्येक चार निरीक्षक सात दिवस चारही जिल्ह्यात मुक्काम करून ते तीन नावांवर मते घेतील व आपला अहवाल अखिल भारतीय काँग्रेस समितीला देतील. राज्यात अशा प्रकारे संघटन सृजन अभियान राबविले जाणार असल्याची अशी माहिती गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी दिली.
काँग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत संघटन सृजन अभियानाविषयी माहिती यांनी माहिती दिली. याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, माजी खासदार फ्रान्सिस सार्दिन, आमदार कार्लोस फेरेरा, आमदार एल्टन डिकॉस्ता आणि उपाध्यक्ष एम. के. शेख यांची उपस्थिती होती. व्हिडिओ कॉन्फर्सिंगद्वारे दिल्लीचे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचाही यात समावेश होता.
ठाकरे म्हणाले, संघटन सृजन अभियानासाठी जिल्हाध्यक्ष निवडण्यासाठी जी आवश्यकता आहे, ती निवडण्यात आली आहेत, त्यानुसार १७ राज्यात ही निवड प्रक्रिया पार पडली आहे. गोव्यात संघटन सृजन अभियानासाठी चार जिल्हाध्यक्ष निवडले जाणार आहेत, त्यात जी चार नावे ठेवण्यात आली आहेत. त्यात म्हादई, उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा व कुशावती जिल्हा अशी चार जिल्हे म्हणून विभाग बनवले आहेत.
त्या ठिकाणी चार जिल्हाध्यक्ष निवडले जातील, त्यासाठी अखिल भारतीय स्तरावरील चार वरिष्ठ पदाधिकारी निवडले जातील, ते सहा-सात दिवस राहतील आणि तेथील कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, पक्षाचे वरिष्ठ कार्यकर्त्यांशी चर्चा करतील. ते जिल्हाध्यक्ष म्हणून ज्यांचे नाव सुचवतील, त्याप्रमाणे ती नावे क्रमांकाने नोंद केली जातील. तीन नावे निश्चित केली जातील, ती नावे अखिल भारतीय काँग्रेस समितीकडे पाठवतील आणि त्यातून जिल्हाध्यक्ष निवडला जाईल.
ते म्हणाले, की या प्रक्रियेची सर्व जबाबदारी वरिष्ठ नेत्यांवर सोपविलेली आहे. त्यांच्याबरोबर राज्यातील वरिष्ठ नेते राहतील आणि ते फक्त पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना मदत करतील. पक्षाच्या कार्यकर्त्यांना या दिल्लीतून येणाऱ्या नेत्यांना भेटता येणार आहे. सात दिवसांचा या दौऱ्यात हे नेते जिल्हाध्यक्ष म्हणून कोण चांगले काम करू शकतो, हे पाहिले जाईल. गटाध्यक्ष, त्यानंतर मंडल अध्यक्ष, बूथ अध्यक्ष निवडले जाणार आहेत. बूथ संघटन मजबूत करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस समितीने दिलेला आहे, असे त्यांनी नमूद केले.
या अभियानासाठी वरिष्ठ नेत्यांची नावे पाटकर यांनी जाहीर केली. ते म्हणाले, उत्तर गोव्यासाठी शोभा ओझा, म्हादईसाठी आर. सी. कुंतिया, दक्षिण गोवासाठी एन. रघुविरा रेड्डी आणि कुशावती जिल्ह्यासाठी विजय इंदर सिंघला हे पक्षाचे वरिष्ठ नेते सात दिवस जिल्हाध्यक्ष निवडीसाठी मते जाणून घेणार आहेत. राज्य सरकाराचे महसुलासाठी तीन जिल्हे आहेत, पण काँग्रेसने हे संघटनासाठी चार जिल्हे केले आहेत. त्यात दोन उत्तर आणि दोन दक्षिण गोव्यात जिल्हे राहतील. म्हादई जिल्ह्यात विधानसभेचे आठ मतदारसंघ असतील, त्यात मांद्रे, पेडणे, डिचोली, मये, साखळी, पर्ये, वाळपई आणि प्रियोळ या मतदारसंघाचा समावेश असेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.