थायलंड समजून गोव्यात येऊ नका! नाईटक्लब बंद करण्याची भाजप नेते सावियो रॉड्रिग्ज यांची मागणी

Illegal nightclubs in Goa: गोव्याची दिल्ली होणार नाही याकडे लक्ष द्यायला हवं, असेही मत सावियो यांनी त्यांच्या पोस्टमधून मांडले आहे.
Goa nightclubs shutdown demand
Savio Rodrigues BJP Goa | Goa nightclubs shutdown demandDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन नाईटक्लबमध्ये लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर राज्यात बेकायदेशीर व्यवसाय, नाईटक्लब यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आगीच्या भीषण घटनेनंतर बेकायदेशीर व्यवसायांवर कारवाईची मागणी होत असताना, प्रशासनाने राज्यातील अवैध तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या क्लबला टाळे ठोकण्यास सुरुवात केलीय. राज्यातील नाईटलाईफ संस्कृती हद्दपार करण्याची मागणी देखील जोर धरु लागली आहे.

भाजप नेते सावियो रॉड्रिग्ज यांनी याबाबत भाष्य करताना गोव्याला नाईट लाईफ संस्कृती घातक ठरत असल्याचे मत व्यक्त केले आहे. तसेच, गोवा म्हणजे थायलंड अशी समजूत करणाऱ्या पर्यटकांना देखील त्यांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे.

"थायलंड समजून गोव्यात येऊ नका. थायलंड संस्कृती हवी असल्यास, तिकडेच जा. गोवा हा गोवाच आहे. गोमंतकीय संस्कृती अनुभवायची असल्यास पर्यटकांनी गोव्यात यावं", अशी पोस्ट सावियो यांनी एक्सवरुन केली आहे.

Goa nightclubs shutdown demand
Vasco Fish Market: प्रतीक्षा संपली! वास्कोतील मासळी मार्केट 29 पासून खुले, सध्याची जागा 28 पर्यंत खाली करण्याचे मुख्याधिकाऱ्यांचे निर्देश

सावियो यांनी गोव्यातील नाईटक्लब संस्कृतीही हद्दपार करण्याची मागणी केली आहे. "गोव्यातील नाईटक्लब संस्कृती बंद करा. ते बेकायदेशीर आहे, तसेच ते गोमंतकीय संस्कृतीचे दर्शन नव्हे. गोवा हे भारताचे पाप-शहर बनू शकते, या स्वैराचारी आणि विकृत विचारसरणीमुळे लादल्या गेलेल्या सांस्कृतिक ऱ्हासापासून आपल्याला गोव्याला स्वच्छ करण्याची गरज आहे", असे मत सावियो यांनी दुसऱ्या एका एक्स पोस्टमधून मांडले आहे.

Goa nightclubs shutdown demand
बाजारात नाताळची धूम! ख्रिसमस ट्री, सजावट साहित्याची खरेदी जोरात; ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी खास ऑफर

गोव्याची दिल्ली होणार नाही याकडे लक्ष द्यायला हवं, असेही मत सावियो यांनी त्यांच्या पोस्टमधून मांडले आहे. "गोवाचे 'दिल्लीकरण' म्हणजे दिल्ली-शैलीच्या प्रशासनाकडून आयात केलेल्या आक्रमक, अनियंत्रित शहरी सवयींमुळे गोव्याचे सांस्कृतिक, पर्यावरणीय आणि प्रशासकीय विकृतीकरण होय", असे सावियो म्हणाले आहेत.

हे विकृतीकरण बेकायदेशीर बांधकाम, नाईट लाईफचा अतिरेक, राजकीय आश्रय, स्थानिक मूल्यांकडे दुर्लक्ष आणि एका संवेदनशील भूमीचे क्षणभंगुर खेळाच्या मैदानात रूपांतरण होण्याकडे कल वाढत आहे, असे मत त्यांनी मांडले.

Goa nightclubs shutdown demand
Nanoda House Fire: नानोड्यात घराला आग; लग्न सोहळ्यासाठी ठेवलेले अडीच लाख रुपये भस्मसात, 10 लाखांच्या मालमत्तेची हानी

"काही गोमंतकीय, विशेषतः राजकीय वर्ग, या दिल्लीकरणाच्या नशेत धुंद होऊन, क्षणिक संपत्तीसाठी आपला विवेक विकतात - जमीन आणि वारसा विकून टाकतात. सहज मिळणाऱ्या पैशांनी आंधळे झालेले हे लोक स्वतःच्याच विनाशात भागीदार बनतात, आणि प्रगतीऐवजी पैशालाच सर्वस्व मानतात, तर दुसरीकडे त्यांची संस्कृती, पर्यावरण आणि प्रतिष्ठा हळूहळू नष्ट होत जाते", असे मत सावियो रॉड्रिग्ज यांनी पोस्टमधून मांडले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com