Nanoda House Fire: नानोड्यात घराला आग; लग्न सोहळ्यासाठी ठेवलेले अडीच लाख रुपये भस्मसात, 10 लाखांच्या मालमत्तेची हानी

Nanoda: बामणवाडा-नानोडा येथे दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास उमेश कांदोळकर यांच्या मातीच्या जुन्या घराला आग लागून रोख रक्कम आणि किमती ऐवज आगीत भस्मसात झाला.
Nanoda House Fire
Nanoda House FireDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: बामणवाडा-नानोडा येथे दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास उमेश कांदोळकर यांच्या मातीच्या जुन्या घराला आग लागून रोख रक्कम आणि किमती ऐवज आगीत भस्मसात झाला. यात सुमारे दहा लाखांच्या मालमत्तेची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. लग्नसमारंभासाठी घरात ठेवलेले रोख अडीच लाख रुपयेही जळून खाक झाले, असे कांदोळकर कुटुंबीयांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, हा घातपाताचा प्रकार असू शकतो, असा संशय घरमालकाने व्यक्त केल्याने डिचोलीचे पोलिस निरीक्षक विजय राणे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने घटनास्थळाची पाहणी केली.

आगीची घटना घडली, तेव्हा घरी कोणीही नव्हते. आग नेमकी कशी लागली,हे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. घरातील टीव्ही,फ्रिजसह अन्य साहित्य भस्मसात झाले.किमती ऐवज जळाल्याने कांदोळकर कुटुंबावर संकट कोसळले आहे. सायंकाळी उशिरा फॉरेन्सिक टीमलाही पाचारण केले होते. पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Nanoda House Fire
Goa Politics: मनोज परब यांच्‍यामुळेच युती झाली नाही! काँग्रेस–फॉरवर्ड युतीला जनता स्‍वीकारणार - माणिकराव ठाकरे

घरात तीन गॅस सिलिंडर होते. मात्र अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिकांनी धावपळ करुन सिलिंडर घराबाहेर काढल्याने अनर्थ टळला. अग्निशमन दलाचे महेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली जवानांनी मदतकार्य केले.

Nanoda House Fire
Goa Crime: गोव्यातील 16 वर्षीय शाळकरी मुलीवर अपहरण करुन लैंगिक अत्याचार; महाराष्ट्रातील 39 वर्षीय नराधमाचा कोर्टाने फेटाळला जामीन

आमदारांची घटनास्थळी धाव

या घटनेची माहिती मिळताच, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाहणी करून कांदोळकर कुटुंबाला धीर दिला. मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक साहाय्य मिळवून देण्यासाठी व घर बांधणीसाठी पुढाकार घेण्याची ग्वाही दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com