Dengue Cases In Curti: डेंग्यूचे कुर्टीत आक्रमण! फोंड्यात 20 रुग्ण सापडले, आरोग्य खात्याकडून स्वच्छता व फॉगिंग मोहिमेची तयारी

Curti Dengue Outbreak: कुर्टीतील झिंगडीमळ, हवेली, वीज खात्याचा परिसर, नागझर, बाबल्या खळ, नागा मशीद परिसर व इतर भागात डेंग्यू रुग्ण सापडले आहेत.
Curti Dengue Outbreak
Dengue Cases In CurtiDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: फोंड्यातील कुर्टी भागात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत असल्याने हा धोक्याचा संकेत असून आवश्‍यक त्या ठिकाणी स्वच्छता मोहीम आणि फॉगिंग हाती घेण्याची जोरदार मागणी करण्यात येत आहे. कुर्टी - खांडेपार पंचायतीच्या ग्रामसभेतही हा विषय चर्चेला आला होता. सद्यस्थितीत कुर्टी भागात किमान वीस डेंग्यूचे रुग्ण सापडले असल्याची माहिती मिळाली आहे.

उघड्यावर साचणारे पाणी तसेच टायर, करवंट्या आणि प्लास्टिक वस्तूत पावसाचे पाणी साचत असल्याने डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती अशा ठिकाणी होत असते. त्यातच अनियमित पाणी पुरवठ्यामुळे बऱ्याच ठिकाणी टाक्यांत पाणी भरून ठेवण्याचे प्रकार होत आहेत.

Curti Dengue Outbreak
Bicholim Dengue Case: डिचोलीत 'डेंग्यू'चा संशयित रुग्ण, जिल्हा इस्पितळात उपचार; उपाययोजनांची मागणी

हे पाणी एकाच जागी साचून राहिल्याने तसेच उघडे ठेवल्यानेही डासांच्या उत्पत्तीचे कारण ठरू शकते, म्हणून असे पाणी साठवून ठेवू नका, असे आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मागच्या काळात बेतोडा तसेच खडपाबांध - फोंडा परिसरात डेंग्यू रुग्ण सापडले होते.

बेतोड्यात दहा डेंग्यू रुग्ण सापडल्यानंतर खडपाबांध येथे डेंग्यू रुग्ण सातत्याने आढळत असल्याने या भागात फॉगिंग व इतर उपाययोजना आरोग्य खात्याने हाती घेतल्या होत्या. आताही त्यात सातत्य ठेवताना कुर्टी भागातही ही मोहीम राबवण्याची मागणी स्थानिकांसह पंचायतीने केली आहे.

Curti Dengue Outbreak
Goa Dengue Malaria Cases: राज्‍यात डेंग्‍यू आणि मलेरियाचे महिन्‍याला सरासरी 153 रुग्‍ण, गेल्‍या तीन वर्षांत सात जणांचा मृत्‍यू

कुर्टीतील या भागात हवी स्वच्छता

कुर्टीतील झिंगडीमळ, हवेली, वीज खात्याचा परिसर, नागझर, बाबल्या खळ, नागा मशीद परिसर व इतर भागात डेंग्यू रुग्ण सापडले आहेत. गेल्या आठवड्याभरात वीस रुग्ण सापडले असल्याने ही रुग्ण संख्या वाढू नये यासाठी प्रत्येकाने आपल्या घराचा परिसर स्वच्छ आणि साफ ठेवण्याची आवश्‍यकता आहे. याशिवाय फॉगिंगची व्यवस्थाही आरोग्य खात्याने करावी, अशीही मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com