Bicholim Dengue Case: डिचोलीत 'डेंग्यू'चा संशयित रुग्ण, जिल्हा इस्पितळात उपचार; उपाययोजनांची मागणी

bicholim dengue suspected case: तब्बल सहा महिन्यानंतर डिचोलीत पुन्हा एकदा ''डेंग्यू''ने डोके वर काढले असून, शहरात एक संशयित रुग्णही आढळला आहे.
Bicholim Dengue Case
Bicholim Dengue CaseDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: तब्बल सहा महिन्यानंतर डिचोलीत पुन्हा एकदा ''डेंग्यू''ने डोके वर काढले असून, शहरात एक संशयित रुग्णही आढळला आहे. जोगीवाडा परिसरातील संशयित रुग्णावर म्हापसा जिल्हा इस्पितळात उपचारही करण्यात आले आहेत, अशी विश्वसनीय माहिती हाती आली आहे.

डिचोलीच्या सामाजिक आरोग्य केंद्राकडून मात्र या माहितीस दुजोरा मिळालेला नाही. मात्र गेल्या अडीज वर्षांत ''डेंग्यू''ने डिचोलीत घातलेला धुमाकूळ पाहता, ''डेंग्यू''चे रुग्ण असल्याचा संशय बळावला आहे. सहा महिन्यांपूर्वी शहरातील बोर्डे भागात ''डेंग्यू''चा फैलाव झाला होता.

Bicholim Dengue Case
Goa Dam Water Level: प्रमुख धरणांतील जलपातळी घसरली! प्रशासनाची चिंता वाढली; मान्सून लांबल्याने पाणीटंचाईचे सावट

बोर्डे येथील एकाच घरातील दोन मुलांसह पाच ते सहाजणांना ''डेंग्यू''ची लागण झाली होती. त्यानंतर ''डेंग्यू'' नियंत्रणात आला आहे. असे वाटत असतानाच, आता पुन्हा ‘डेंग्यू’चा रुग्ण आढळून आल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

अडीच वर्षांपूर्वी भर पावसाळ्यात डिचोली शहरात ‘डेंग्यू’चा झपाट्याने फैलाव झाला होता. त्यावेळी ‘डेंग्यू’ने शहरात अक्षरशः धुमाकूळ घातला होता. डेंग्यूचे जवळपास वीस रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर हळूहळू ‘डेंग्यू’ चा फैलाव नियंत्रणात आला.

Bicholim Dengue Case
Goa Politics: 'आप' आणि 'आरजी' समोर काँग्रेस लोटांगण घालणार? अस्तित्वासाठी विरोधकांशी जुळवून घेण्याशिवाय पर्याय नाही!

‘डेंग्यू’ नियंत्रणात आल्याने जनतेने सुटकेचा श्वास घेतला होता. त्यानंतर सहा महिन्यांपूर्वी शहरात पुन्हा ‘डेंग्यू’चा फैलाव झाला होता. त्यानंतर आता ‘डेंग्यू’चा संशयित रुग्ण मिळाल्याची माहिती आहे. ‘डेंग्यू’ने धुमाकूळ घालण्यापूर्वी आरोग्य खात्याने त्वरित प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी. अशी मागणी जनतेकडून होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com