Goa Assembly Elections: पक्ष बळकटीसाठी कंबर कसली! दामू नाईक यांच्या कडून राजकीय बैठकांचा धडाका; आमदारांच्या कामगिरीच्या आढाव्यासह नव्या चेहऱ्यांचा शोध सुरू

Damu Naik: विधानसभा निवडणुकीत ३० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा निर्धार करून मैदानात उतरलेल्या प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी स्वप्नपूर्तीसाठी कंबर कसली आहे.
Damu Naik
Goa Assembly ElectionsDainik goamantak
Published on
Updated on

पणजी: विधानसभा निवडणुकीत ३० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा निर्धार करून मैदानात उतरलेल्या प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी स्वप्नपूर्तीसाठी कंबर कसली आहे. त्यांनी प्रत्येक मतदारसंघात जाऊन तेथील भाजप गटांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्याचा सपाटा लावला आहे.

प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर दामू नाईक अध्यक्ष या नात्याने प्रथमच विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत. २०२७ ची विधानसभा निवडणूक जिंकून भाजपला सलग चौथ्यांदा राज्यात सत्ता मिळवून देण्याचा चंग त्यांनी मनाशी बांधला आहे.

Damu Naik
Damu Naik: भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष दामू नाईकांची वर्षपूर्ती आणि फोंड्याची पोटनिवडणूक

ज्या मतदारसंघांत भाजपचे आमदार आहेत, त्यांच्या कामांचा, त्यांच्या कामांबाबत जनतेत असलेल्या भावना आणि येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या जिंकण्याच्या शक्यता अशा अनेक विषयांवर दामू पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करीत आहेत.

भाजपने यावेळी काही मतदारसंघांत नवे चेहरे देण्याचे आधीच निश्चित केले आहे. त्यानुषंगाने ज्या मतदारसंघांतील भाजप आमदार कामगिरीत कमी पडलेले आहेत, तेथे नव्या चेहऱ्यांचा शोध घेण्यासही दामू नाईक यांनी सुरुवात केली आहे. त्याबाबत पदाधिकाऱ्यांसह स्थानिकांकडूनही ते अंदाज घेत असल्याचे सूत्रांनी नमूद केले.

Damu Naik
Damu Naik: 118 सभा, दोन्‍ही जिल्‍हा पंचायतींवर स्‍पष्‍ट बहुमत; 'दामू नाईकां'च्‍या प्रदेशाध्‍यक्षपदाला एक वर्ष पूर्ण

हरलेले मतदारसंघ केंद्रस्थानी

गत विधानसभा निवडणुकीत भाजपला ज्या मतदारसंघांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला, ते मतदारसंघ दामू नाईक यांनी यावेळी केंद्रस्थानी ठेवले आहेत. हरलेल्या मतदारसंघांत यावेळी भाजपचा झेंडा फडकावण्याच्या दृष्टीने काय करता येईल, याचा अंदाज ते तेथील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी बोलून घेत आहेत. त्याचवेळी सासष्टीतील मतदारसंघांबाबतही वेगळ्या पद्धतीने रणनीती आखण्यात येत आहे, असेही सूत्रांनी सांगितले.

चोडणकर यांच्याकडूनही दौरे सुरू

अमित पाटकर यांना हटवून काँग्रेसने काहीच दिवसांपूर्वी गिरीश चोडणकर यांची प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक केली आहे. तेव्हापासून चोडणकर यांनीही पक्ष संघटनेचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी ते विविध मतदारसंघांचा दौरा करून नव्या नेत्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देत असल्याचे दिसून येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

60 Crore Fee Scam
Damu Naik NEET Paper Leak
damu naik warns babu ajgaonkar
Akshat Naik Death Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com