Goa Drunk Driving: मद्यपी चालकांवर आता थेट गुन्हे! वाहतूक खात्याचा निर्णय, पोलिसांना कठोर कारवाईच्या सूचना

Criminal Cases Against Drunk Drivers: मद्यधुंद अवस्थेत प्रवासी वाहने चालवून प्रवाशांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या चालकांविरोधात आता केवळ दंडात्मक कारवाई न करता थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
Criminal Cases Against Drunk Drivers
Goa Drunk DrivingDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: मद्यधुंद अवस्थेत प्रवासी वाहने चालवून प्रवाशांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या चालकांविरोधात आता केवळ दंडात्मक कारवाई न करता थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. मोटार वाहन कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार कठोर कारवाई करण्याच्या सूचना वाहतूक विभागाने राज्यातील पोलिस यंत्रणेला दिल्या आहेत.

त्यामुळे मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या चालकांवर आता अधिक कडक कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. वाहतूक विभागाने घेतलेल्या या निर्णयानुसार मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणाऱ्या चालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्यातील कलम १८५, २०२, २०३ आणि २०४ अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. याआधी अशा प्रकरणांत बहुतांश वेळा दंड अथवा परवाना निलंबनासारखी कारवाई केली जात होती.

Criminal Cases Against Drunk Drivers
Mitchell Marsh Drinking Beer: वादग्रस्त बोलणं पडलं महागात! फक्त '6 बिअर' बोलल्यामुळे मिचेल मार्शला संघातून 'डच्चू'! काय आहे नेमकं प्रकरण? Watch Video

मात्र, वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर अधिक कठोर भूमिका घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात विशेषतः खासगी प्रवासी बस चालकांकडून मद्यप्राशन करून वाहन चालविल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत होत्या. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या पार्श्वभूमीवर खासगी बसमालक संघटनेनेही मद्यधुंद चालकांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी शासनाकडे केली होती.

Criminal Cases Against Drunk Drivers
Margao Railway Station: दारुड्याला वाचवण्‍यासाठी दोन पोलिसांमध्‍येच जुंपली! मडगाव रेल्‍वे प्‍लॅटफॉर्मवर ‘फ्रिस्‍टाईल’ हाणामारी

त्यानंतर वाहतूक खात्याने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचे समजते. या निर्णयामुळे राज्यभरात मद्यधुंद चालकांविरोधात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येण्याची शक्यता असून, श्वसन चाचणी (ब्रेथ अॅनालायझर) आणि अन्य तपासण्यांद्वारे चालकांची तपासणी अधिक तीव्र केली जाणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर गुन्हा नोंदवून न्यायालयीन प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याने अशा प्रकारांना मोठा आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

कठोर भूमिका!

वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीने शासनाचा हा निर्णय महत्त्वाचा मानला जात असून, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणाऱ्यांना यापुढे कोणतीही सवलत मिळणार नसल्याचा स्पष्ट संदेश या निर्णयातून देण्यात आला आहे. विशेषतः प्रवासी वाहन चालकांनी जबाबदारीने वाहन चालवावे आणि प्रवाशांच्या जीवाशी कोणत्याही प्रकारे खेळ करू नये, यासाठी ही कठोर भूमिका घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com