Margao Railway Station: दारुड्याला वाचवण्‍यासाठी दोन पोलिसांमध्‍येच जुंपली! मडगाव रेल्‍वे प्‍लॅटफॉर्मवर ‘फ्रिस्‍टाईल’ हाणामारी

Konkan railway police constable scuffle: एका दारुड्याला वाचविण्‍यासाठी एका पाेलीस शिपायानेच दुसऱ्या पोलिस शिपायाला धक्‍काबुक्‍की करण्‍याचा प्रकार घडला.
Margao platform fight incident
Margao platform fight incidentDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: रेल्‍वे स्‍थानकावर येणाऱ्या दारुड्यांपासून लोकांना वाचविण्‍याची जबाबदारी पोलिसांवर असताना रेल्‍वे स्‍थानकावर बसलेल्‍या काही मजुरांना मारहाण करणाऱ्या एका दारुड्याला वाचविण्‍यासाठी एका पाेलीस शिपायानेच दुसऱ्या पोलिस शिपायाला धक्‍काबुक्‍की करण्‍याचा प्रकार घडला.

Margao platform fight incident
Vasco Drink And Drive Case: पुन्हा ‘ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह’! भरधाव कार शटर तोडून रेस्टॉरंटमध्ये घुसली

मडगाव रेल्‍वे स्‍थानकाच्‍या प्‍लॅटफॉर्म नं. ६ वर झालेली ही ‘फ्रिस्‍टाईल’ पाहिलेल्‍या लोकांनी या धक्‍काबुक्‍की करणाऱ्या पोलिसाला निलंबित करावे, अशी मागणी केली आहे.

म्हणे, ही किरकोळ बाचाबाची

यासंदर्भात कोकण रेल्‍वे पोलिस निरीक्षकांशी संपर्क साधला असता, ही किरकोळ स्‍वरूपाची बाचाबाची हाेती आणि यासंदर्भात कुणीही तक्रार नोंदविली नाही, असे त्‍यांनी सांगितले. ज्‍याने मजुरांना मारहाण केली, त्‍याला पोलिसांनी ताब्‍यात घेतले असून पुढील चौकशी सुरू असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com