Panaji News : विंडो पेन ओयस्टरचे संरक्षण ही काळाची गरज : इंगोले

चिखली-सांकवाळ किनाऱ्यावरील विंडो पेन ओयस्टर्सच्या अतिरिक्त उत्खननामुळे उपलब्धतेवर आणि जगण्यावर विपरित परिणाम
 Window Pane Oysters
Window Pane OystersGomantak Digital Team
Published on
Updated on

पणजी : अरबी समुद्राला सुकतीच्या वेळी शेकडो लोक चिखली-सांकवाळ  किनाऱ्यावर  विन्डो पेन शिंपल्या काढताना दिसतात. पर्यावरण कार्यकर्ते आणि शास्त्रज्ञांना वाटते की, विंडो पेन ओयस्टरच्या दुर्मीळ प्रजातींचे भविष्यासाठी संरक्षण आणि जतन करणे आवश्यक आहे.

एनआयओचे माजी शास्त्रज्ञ बबन इंगोले म्हणाले की, चिखली-सांकवाळ किनाऱ्यावरील विंडो पेन ओयस्टर्सच्या अतिरिक्त उत्खननामुळे त्यांच्या उपलब्धतेवर आणि जगण्यावर विपरित परिणाम होईल. एनआयओने चिखली-सांकवाळ किनारी या विंडो पेन ओयस्टरच्या पुरेशा उपलब्धतेबद्दल अभ्यास केला आहे.

या विंडो पेन ओयस्टर्सच्या ऱ्हासाची काही कारणे म्हणजे समुद्रातील जास्त उत्खनन, ड्रेजिंग आणि प्रदूषण आहेत. विंडो पेन ऑयस्टरचे पुढील पिढीसाठी संरक्षण आणि जतन करण्याची वेळ आली आहे.

 Window Pane Oysters
Karnataka Viral Video: 'इडली सांबर अच्छा है, गोवावाला...', कर्नाटकात काँग्रेस आमदार समर्थकांनी घोषणा देताना ओलांडली मर्यादा

चिखलीचे पर्यावरण कार्यकर्ते सिरिल फर्नांडिस म्हणाले की, चिखली-सांकवाळ येथील ग्रामस्थांना चिखली किनाऱ्यावर समृद्ध जैवविविधता आणि विंडो पेन ऑयस्टर आहेत हे माहीत आहे. जुन्या काळी गावकरी हे शिंपले विकून आपला उदरनिर्वाह करत होते.

 Window Pane Oysters
Lost Mobile Tracking: मोबाईल हरवला किंवा चोरीला गेल्यास मिनिटात स्वतःच करू शकता ट्रॅक, ‘ही’ पद्धत येईल कामी

गेल्या काही वर्षांमध्ये, शेजारच्या भागातील लोकांनी या जास्त ऑयस्टर काढण्यास सुरुवात केली ज्यामुळे अलीकडे त्यांची उपलब्धता कमी झाली. मी सर्व लोकांना विनंती करू इच्छितो की हे शिंपले या ठिकाणी टिकून राहण्यासाठी गरजेपेक्षा जास्त उत्खनन करू नका.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com