Lost Mobile Tracking: मोबाईल हरवला किंवा चोरीला गेल्यास मिनिटात स्वतःच करू शकता ट्रॅक, ‘ही’ पद्धत येईल कामी

सीईआयआरच्या माध्यमातून नागरिकांना चोरी झाल्यास त्यांचे स्मार्टफोन ब्लॉक करण्याची सुविधा मिळते. एखाद्या नागरिकाचा मोबाईल ब्लॉक झाला की, सरकार फोन ट्रॅक करून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करते.
Mobile
MobileDainik Gomantak
Published on
Updated on

Indian Government Launches CEIR Tracking System For Lost Mobile Tracking: दिवसेंदिवस मोबाईल चोरीला जाण्याच्या घटना समोर येत आहे. अशातच आता सरकार 17 मे पासून एक नवीन ट्रॅकिंग सिस्टम सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर (CEIR) लाँच करणार आहे.

या ट्रॅकिंग सिस्टीमद्वारे लोक त्यांचा हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल शोधू शकतील किंवा तो ब्लॉक करू शकणार आहे 

CEIR दूरसंचार विभागाने (CDoT) तयार केला आहे. 17 मे पासून देशभरात याची सुरुवात होणार आहे. सीईआयआरच्या अधिकृत वेबसाइटनुसार, या वर्षी मार्चमध्ये सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये चाचणी आधारावर ही सिस्टम सुरू करण्यात आली. पण बुधवारपासून ते पूर्णपणे सुरू होणार आहे. 

सीईआयआरच्या माध्यमातून लोकांना चोरी झाल्यास त्यांचे स्मार्टफोन ब्लॉक करण्याची सुविधा मिळणार आहे. एखाद्या व्यक्तीचा मोबाईल ब्लॉक झाला की, सरकार फोन ट्रॅक करून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करते.

स्मार्टफोन वापरकर्ते त्यांचा हरवलेला फोन CEIR वेबसाइट किंवा KYM (Know Your Mobile) अॅपद्वारे ब्लॉक करू शकतो.

सीडीओटीचे अध्यक्ष राजकुमार उपाध्याय म्हणाले, ही सिस्टिम तयार आहे आणि आता ती या तिमाहीत संपूर्ण भारतात (India) लाँच केली जाईल. यामुळे लोक त्यांचे हरवलेले मोबाइल फोन ब्लॉक आणि ट्रॅक करण्यास सक्षम असतील. 

भारत सरकारने इंटरनॅशनल मोबाईल (Mobile) इक्विपमेंट आयडेंटिटी (IMEI) उघड करणे आधीच बंधनकारक केले आहे. या प्रकरणात मोबाइल नेटवर्कमध्ये आधीपासूनच IMEI क्रमांकांची सूची असेल. जर कोणताही अनधिकृत मोबाईल फोन तर तो शोधला जाईल. 

Mobile
Flight To Goa: येत्या 23 मे पासून 'या' शहरातून गोव्याला थेट विमानसेवा सुरू होतेय, जाणून घ्या सविस्तर
  • महाराष्ट्रातील CEIR मार्फत 711 फोन जप्त करण्यात आले

पोलिसांनी ठाणे, महाराष्ट्रात 1.28 कोटी रुपयांचे 711 फोन जप्त केले आहेत. हे फोन हरवले किंवा चोरीला गेले होते. पोलिसांनी त्यांना जप्त केले आणि त्यांच्या मालकांच्या ताब्यात दिले. सीईआयआर वापरून पोलिसांनी जानेवारी ते एप्रिल या कालावधीत त्यांना जप्त केले. 

  • किती यशस्वी CEIR

CEIR च्या अधिकृत वेबसाइटनुसार, या सिस्टिमद्वारे आतापर्यंत 4,77,996 फोन ब्लॉक करण्यात आले आहेत. तर 2,42,920 फोन ट्रॅक करण्यात आले आहेत. त्याच वेळी, 8,498 फोन शोध देखील काढले आहेत. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com