नागरिकांनी जेनेरिक औषधांचा वापर करावा : डॉ. शेखर साळकर

महत्त्वाच्या शहरांमध्ये जेनेरिक औषधांसाठी सेंटर उभारण्यात येत असल्याची माहिती
Dr. Shekhar Salkar Press Conference
Dr. Shekhar Salkar Press ConferenceDainik Gomantak

पणजी : सर्वसाधारणपणे डॉक्टरांनी प्रिस्क्रिप केलेली व बाजारात मिळत असलेली औषधे आणि जेनरिक औषधे गुणात्मक दृष्टीने एकाच प्रकारची आहेत. मात्र त्याच्या किंमतीमध्ये मोठा फरक असल्याने नागरिकांनी जेनेरिक औषधांचा वापर करावा असे आवाहन डॉ. शेखर साळकर यांनी केलं आहे. (Dr. Shekhar Salkar Press Conference News Updates)

Dr. Shekhar Salkar Press Conference
पेडणे येथील घराला आग; 3 लाखांचे नुकसान

डॉ. शेखर साळकर भाजपच्या (BJP) मेडीकल सेलचे प्रमुख डॉ. शेखर साळकर असून राज्याच्या कोव्हिड टास्क फोर्सचे सदस्यही आहेत यांनी केला आहे. राज्यात जेनेरिक औषधांचा पुरवठा वाढला आहे. महत्त्वाच्या शहरांमध्ये अशा स्वरूपाची सेंटर उभारण्यात येत आहेत, त्याचा लाभ नागरिकांनी घेतल्यास पैशांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बचत होईल, असे मत डॉ. शेखर साळकर यांनी व्यक्त केले आहे.

Dr. Shekhar Salkar Press Conference
करमणे येथे मृतदेह सापडल्याने खळबळ

डॉक्टरांकडून प्रामुख्याने जेनेरिक औषधं (Medicines) दिली जात नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना मोठा आर्थिक भूर्दंडही पडतो. मुंबईसारख्या शहरात जेनेरिक औषधं मिळतात, त्याच धर्तीवर गोव्यातही (Goa) जेनेरिक औषधांचा पुरवठा वाढला आहे. तसंच महत्त्वाच्या शहरांमध्ये जेनेरिक औषधांची सेंटर्सही उभारण्यात येणार असल्याचं डॉ. शेखर साळकर यांनी स्पष्ट केलं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com