Goa BJP Politics : काँग्रेसच्या बंडखोर आमदारांना महिना लोटूनही पदांची हुलकावणी

नवभाजप सदस्य अस्वस्थ; दिगंबर कामतांना उपमुख्यमंत्रीपद मिळणार असल्याच्या चर्चा
Goa Congress MLA
Goa Congress MLADainik Gomantak
Published on
Updated on

Goa BJP Politics : काँग्रेसमधून आठजणांना फोडून आणण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी सर्व पराकाष्ठा करत दिगंबर कामत, मायकल लोबो या त्यांच्या नेत्यांनी तोंडभरून आश्‍वासनेही दिली. परंतु एक महिना लोटूनही त्यांच्या कोणत्याही मागण्यांची वासलात लावण्यात आली नाही, की एक गट म्हणून भाजपच्या प्रमुख नेत्यांनी त्यांची विचारपूसही केलेली नाही. भाजपचे प्रभारी सी. टी. रवी यांनी तर त्यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या. त्यामुळे भाजपच्या 8 नवीन सदस्यांमध्ये अस्वस्थता आहे.

सूत्रांच्या मते, मंत्रिपदाबाबत दिल्लीच्या निर्णयाची वाट पाहिली जात असली तरी इतर सदस्यांना महत्त्वाची महामंडळे दिली जाऊ शकतात. परंतु याबाबत दिगंबर कामत व मायकल लोबो यांच्याशी सुरुवातीला मुख्यमंत्र्यांची बैठक अपेक्षित आहे. दिगंबर कामत यांनी रविवारी मडगावमध्ये आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यानंतर लागलीच ते सबरीमलाच्या यात्रेवर निघून गेले. गेल्या महिन्यात याच यात्रेवर निघाले असताना अचानक दिल्लीचे आमंत्रण आल्याने केरळ मार्गे ते परस्पर दिल्लीला गेले होते. हा पुढचा आठवडा ते सबरीमलाच्या दर्शनासाठी असतील.

मंत्रिपदासाठी आलेक्स सिक्वेरांचे नाव निश्‍चित!

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, दिगंबर कामत व मायकल लोबो यांच्या बरोबरीने इतर सदस्यांबरोबर मुख्यमंत्र्यांची अद्याप बैठक झालेली नाही. या दरम्यान मुख्यमंत्री नवी दिल्लीला जाऊन आलेले आहेत. नव्याने प्रवेश घेतलेल्यांपैकी एक किंवा दोन सदस्यांना मंत्रिपद व इतरांना महामंडळे देण्यासंदर्भात सर्वसाधारणपणे सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु अद्याप त्यांची अंमलबजावणी झालेली नाही. आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रिपद देण्याचे निश्‍चित झाल्याच्या बातमीला दुजोरा मिळतो.

Goa Congress MLA
Goa Mining : पिसुर्लेतील खनिजामध्ये सोन्याचा अंश नाहीच!

कामत उपमुख्यमंत्रिपदी?

दिगंबर कामत यांचे पाठिराखे त्यांना उपमुख्यमंत्रिपद मिळणार असल्याचे सांगतात. परंतु भाजपच्या सूत्रांच्या मते दिगंबर कामत ज्येष्ठ नेते असल्याने ते स्थानिक पातळीवर मंत्रिपद घेण्याऐवजी लोकसभा निवडणूक लढविण्याचे पसंत करतील. तशीच चर्चा केंद्रीय नेत्यांबरोबर झालेली आहे. कामत भाजपात प्रवेश घेतल्यानंतर दिल्लीला जाऊन आले आहेत. तेथे त्यांची अमित शहा यांच्याबरोबर दीर्घ बैठक झाली. परंतु पंतप्रधानांबरोबर बैठक ठरूनही त्यांना वेळ मिळू शकलेला नाही.

‘आम्हाला कोणीच विचारत नाही’

भाजपच्या 8 नवीन सदस्यांमध्ये अस्वस्थता आहे. त्यांना खाती आणि नवीन पदे मिळावीत अशी अपेक्षा आहे. कामत यांच्या मागे त्यांनी तगादा लावला आहे. सुत्रांच्या मते, आलेक्स सिक्वेरा आक्रमक भाषा बोलतात. दुसरीकडे ‘आम्हाला भाजपात कोणी विचारत नाही. सरकारमध्येही कोणते स्थानही नाही,‘ अशी प्रतिक्रिया एका आमदाराने दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com