Goa Congress Protest: ...तरी आम्हाला रोखू शकत नाही! काँग्रेस नेत्यांचा भाजपला इशारा, पणजीत 'ईडी' समोर निदर्शने

Congress Protest ED Office Panaji: सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर सक्त वसुली संचालनालयाने आरोपपत्र दाखल केल्याचा निषेध करण्यासाठी कॉंग्रेसने ईडीच्या पाटो पणजी येथील कार्यालयासमोर निदर्शने केली.
Goa Congress Protest
Goa Congress ProtestDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: भाजपच्या खालच्या पातळीच्या राजकारणामुळे आणि त्यांच्या अंकित असलेल्या तपास यंत्रणांमार्फत आमच्यावर खोटे गुन्हे व आरोपपत्रे दाखल करून आम्हाला थांबवता येणार नाही, असा इशारा कॉंग्रेसच्या नेत्यांनी दिला. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर सक्त वसुली संचालनालयाने आरोपपत्र दाखल केल्याचा निषेध करण्यासाठी कॉंग्रेसने ईडीच्या पाटो पणजी येथील कार्यालयासमोर आज निदर्शने केली.

प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रतीक्षा खलप यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी पाटकर म्हणाले, आरोपपत्र दाखल करणे ही सूडबुद्धीची आणि धमकी देण्याची एक नीच पातळीची राजकीय चाल आहे.

आम्हाला अशा भंपक आणि खालच्या स्तरावरील राजकारणाची भीती वाटत नाही. उलट, हीच गोष्ट आम्हाला या फूट पाडणाऱ्या, हुकूमशाही, दादागिरी आणि विनाशकारी सत्तेविरुद्धची लढाई अधिक बळकट करण्यास प्रवृत्त करते.

Goa Congress Protest
Goa Forest: गोव्यातील निम्म्या वनक्षेत्राला वणव्याचा धोका, केंद्रीय संशोधन संस्थेच्या अभ्यासात धक्कादायक माहिती उघड

आलेमाव म्हणाले, भाजपने विसरू नये, की हे तेच कुटुंब आहे ज्यांनी देशासाठी आपले रक्त दिले आहे. राहुल गांधी हे फक्त १४ वर्षांचे होते, जेव्हा त्यांची आजी आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली.

राहुल गांधी हे केवळ २१ वर्षांचे होते, जेव्हा त्यांचे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचीही हत्या झाली. ही त्यागाची भावना या कुटुंबाने देशासाठी दिली आहे.

Goa Congress Protest
Green Lungs Goa: राज्यातील शहरांना प्राणवायूचे 'बूस्ट', 'ग्रीन लंग्‍स' उपक्रमाला राज्यातील पालिकांचा पाठिंबा; वनमंत्री राणे यांची माहिती

कला अकादमी घोटाळ्यावर कारवाई करा!

जर भाजप खरंच ‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ या घोषणेत प्रामाणिकता असेल, तर त्यांनी कला अकादमीतील घोटाळ्यावर कारवाई करावी, जिथे डान्सबारची लाईट्स बसवण्यात आल्या. ग्रीन सेस संकलन घोटाळ्यावर, कॅसिनो फी संकलन घोटाळ्यावर, स्मार्ट सिटी घोटाळ्यावर आणि इतर अनेक भ्रष्ट प्रकरणांवर खटले दाखल करावेत, अशी मागणी युरी आलेमाव यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com