
पणजी: गोव्याच्या सुमारे निम्म्या वनक्षेत्राला वणव्याचा गंभीर धोका असल्याचे चित्र समोर आले आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या केंद्रीय किनारी शेती संशोधन संस्था या सरकारी संस्थेने सादर केलेल्या ताज्या अभ्यासात ही धक्कादायक बाब उघड झाली आहे. गोवा वनविभागाच्या मागणीनुसार केलेल्या या अभ्यासात जंगलांमध्ये वणव्याची कारणे, धोका आणि उपाययोजनांचा यात समावेश आहे.
गोवा हे राज्य वार्षिक सरासरी ३ हजार ८०० मिमी पावसामुळे व किनारी दमट हवामानामुळे आतापर्यंत वणव्यापासून बऱ्यापैकी सुरक्षित होते. मात्र, गेल्या काही वर्षांत मानवी हस्तक्षेप, हवामानातील बदल, जमिनीचा वाढता वापर आणि नियोजनशून्य वृक्षतोडीमुळे जंगलात आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे.
२०१७ ते २०२३ या कालावधीत राज्यात सुमारे ५२१ हेक्टर जंगल वणव्याने प्रभावित झाले असून २०१९-२० या वर्षात सर्वाधिक नुकसान झाले, असे अहवालात नमूद केले आहे.
हा अभ्यास अहवाल निसर्गासाठी एक गंभीर इशारा आहे. एकेकाळी सुरक्षित मानली जाणारी गोव्याची जंगले आता आगीच्या संकटाच्या उंबरठ्यावर उभी आहेत. भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी सरकार, वनविभाग आणि स्थानिक लोकसंघटनांनी एकत्र येऊन तातडीने पावले उचलण्याची गरज आहे.
आगीमुळे होणारी हानी
आगीत झाडांच्या काड्यापत्ते, झुडपे आणि पुनरुत्पादन झालेल्या वनस्पती जळून जात आहेत. त्यामुळे जमिनीतील जैविक घटक कमी होऊन मातीकणांचा पोत खराब होतो. शिवाय पक्ष्यांची घरटी, प्राण्यांची वस्ती आणि पुनरुत्पादनाची साखळी खंडित होते.
वणव्याची प्रमुख कारणे
पावसाचे दिवस कमी होणे आणि तापमानवाढ
सुक्या पानांचा आणि गवताचा साठा
वस्ती आणि रस्त्यांच्या आसपास मानवी क्रियाकलाप
अनधिकृत काजू लागवडीसाठी जंगलतोड
जैवविविधतेवर गंभीर परिणाम
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.