मिलिंद नाईक यांच्याविरोधात काँग्रेस जाणार न्यायालयात

माजी मंत्री मिलिंद नाईक यांच्यावर गुन्हा नोंदवण्याची काँग्रेस करणार कोर्टाकडे मागणी
Congress Protest Against Milind Naik
Congress Protest Against Milind NaikDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : भाजपचे माजी मंत्री मिलिंद नाईक यांच्यावर सेक्स स्कँडल प्रकरणी एफआयआर का दाखल केला गेला नाही असा प्रश्न महिला काँग्रेस आणि युवक काँग्रेसच्या सदस्यांनी उपस्थित केला आहे. शुक्रवारी पणजीतील महिला पोलिस स्थानकावर जाऊन यासंदर्भात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी प्रश्न केले. (Congress Protest Against Milind Naik News Updates)

Congress Protest Against Milind Naik
आरजी नेते मनोज परब यांनी 'हे' आरोप खोडून काढले

यावेळी महिला काँग्रेसच्या अध्यक्ष बिना नाईक, युवक काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. वरद म्हार्दोळकर यांच्यासह काँग्रेसच्या विविध मतदारसंघातील गटातील महिला यावेळी उपस्थित होत्या. भाजपचे नेते व मुरगावच्या आमदारावर गुन्हा का दाखल झाला नाही, याचे उत्तर महिला पोलिस स्थानकाचे अधिकारी देऊ शकले नाहीत.

Congress Protest Against Milind Naik
किनाऱ्यावर सागरी कासवांचे उशिराने आगमन

'काँग्रेसचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी 15 डिसेंबर रोजी मिलिंद नाईक (Milind Naik) यांच्या विरोधात सेक्स स्कँडलप्रकरणी तक्रार दाखल केली होती. आता एक महिना उलटून गेला तरी अद्याप पोलिसांनी केस नोंद केलेली नाही.' असा आरोप बीना नाईक यांनी केला आहे. संकल्प आमोणकर यांचा भाजप सरकारकडून छळ केला जात आहे आणि पीडितेने केलेल्या तक्रारीच्या प्रकरणात त्यांना चौकशीसाठी क्राईम ब्रँचकडे बोलावले जात आहे, असे त्या म्हणाल्या.

Congress Protest Against Milind Naik
गोविंद गावडे यांच्या भाजप प्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढली!

पीडितेने बिहार पोलिस ठाण्यात संकल्प आमोणकर विरोधात तक्रार दाखल करताच, ती मुरगाव पोलिस ठाण्यात हस्तांतर करण्यात आली आणि गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच वेगाने गोवा पोलिसांनी मिलिंद नाईकवर गुन्हा दाखल करायला हवा होता. गोवा पोलिसांनी असे का केले नाही, असा प्रश्न बिना नाईक (Bina Naik) यांनी केला. महिलेला गर्भपात करण्यास भाग पाडणे हा गंभीर गुन्हा आहे, मात्र भाजप सरकार मिलिंद नाईक यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्या म्हणाल्या. 'गुन्हेगारांना संरक्षण दिल्यावर गोव्यात महिलांना सुरक्षित कसे वाटेल,' असाही प्रश्न बीना नाईक यांनी केला.

Congress Protest Against Milind Naik
Michael Lobo: लोबोंच्या पक्षत्यागामुळे भाजपवर काडीचाही परिणाम होणार नाही

जर पोलीस (Police) मिलिंद नाईक यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात अपयशी ठरले तर न्यायालयात धाव घेणार असं वरद म्हार्दोळकर यांनी सांगितले. संकल्प आमोणकर यांना मुरगावात चांगला प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे त्यांची राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करण्यासाठी भाजप त्यांना गुन्हे शाखेत बोलावून त्रास देत आहे, असा आरोपही म्हार्दोळकर यांनी केला. माजी मंत्र्यांच्या कृत्याचा निषेध करत काँग्रेस (Congress) समर्थकांनी मिलिंद नाईक यांच्या पुतळ्याचे दहन केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com